Jalgaon SSC Exam Result : पारोळा तालुक्यात दहावीचा 95 टक्के निकाल

Jalgaon News : तालुक्यात १,५१४ मुले व १,०६६ मुली असे एकूण २,५८० विद्यार्थी--विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेला बसलेले होते.
SSC Exam Result
SSC Exam Resultesakal
Updated on

पारोळा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी (ता.२७) जाहीर झाला. यात पारोळा तालुक्यातील दहावीचा निकाल ९५ टक्के लागला. तालुक्यात १,५१४ मुले व १,०६६ मुली असे एकूण २,५८० विद्यार्थी--विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेला बसलेले होते. (Jalgaon SSC Exam Result Parola taluka)

दहावीच्या परीक्षेच्या निकालात १,४५० मुले व १,०१५ मुली असे एकूण २,४६५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांचा ९५.७७ टक्के व मुलींचा ९५.२१ टक्के असा एकूण ९५.५४ टक्के निकाल तालुक्याचा लागला आहे. त्यात एनइएस माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल ९७.९५ टक्के लागला.

संस्थाध्यक्ष ॲड. वसंत मोरे, चेअरमन मिलिंद मिसर, सचिव ए. आर. बागुल, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या परीक्षेत विद्यालयात प्रथम जयेश सतीश पाटील (८९.८० टक्के), द्वितीय गौरव सुनील पाटील (८९.४० टक्के), तृतीय गौरव बंडू पाटील (८८ टक्के), चतुर्थ तुषार रामकृष्ण पाटील (८७.८० टक्के), पाचवा सोहम दिनेश बोरसे (८७.४० टक्के) (latest marathi news)

SSC Exam Result
SSC Exam Result : ६० वर्षाच्या आजीने मिळविले चक्क ६० टक्के गुण

योगेश्वर विद्यालय, सावखेडे तुर्क

सावखेडे तुर्क (ता. पारोळा) येथील योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.१८ टक्के लागला. यंदाही विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयातून विवेक एकनाथ पाटील हा विद्यार्थी ८७.८० गुण मिळवून प्रथम आला. द्वितीय कुणाल जिजाबराव पाटील (८४.२० टक्के) व तृतीय क्रमांक आदित्य किरण कापुरे (८१.६०) याने मिळविला.

अनेक विद्यार्थ्यांनी जवळपास ८० टक्क्याच्यावर गुण मिळवीत विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली. याबद्दल संस्थेचे चेअरमन डी. एम. पाटील, प्राचार्य आर. जी. पाटील, जी. एस. पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

श्री स्वामी समर्थ विद्यालय

पारोळा येथील श्री स्वामी समर्थ माध्‍़यमिक विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला. त्यात प्रथम क्रमांक प्राची मोतीलाल पाटील (९० टक्के) हिने मिळविला. द्वितीय प्रियंका प्रदिप पाटील (८५.०६ टक्के) व तृतीय क्रमांक देवयानी विनोद पाटील (८५ टक्के) हिने मिळविला.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गोविंद टोळकर, संस्थाध्यक्ष बापू नावरकर, अनिल टोळकर, गणेश बिचवे, देवेंद्र जैन, संजय पाखले, सोमनाथ टोळकर, सुनील शहा, दहावीचे वर्गशिक्षक विजय निंबा चांदवडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंतांचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SSC Exam Result
SSC Result : हलगी-घुमक्याचा ताल, गुलाल-पिवडीची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मोठा जल्लोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.