SSC-HSC Admission : दहावी-बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी काढून ठेवा ‘हे’ दाखले; विद्यार्थ्यांसह पालकांना आवाहन

SSC-HSC Admission : इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी वेळेत करून घ्यावी.
admission
admissionesakal
Updated on

SSC-HSC Admission : इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी वेळेत करून घ्यावी. त्यासाठी जात पडताळणी समितीकडे ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव समितीकडे सादर करावा. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेळेत प्रमाणपत्र मिळेल. प्रमाणपत्र देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते, पण विद्यार्थ्यांना प्रवेशास कोणतीही अडचण येणार नाहीत, त्यादृष्टीने प्रमाणपत्र दिले जाते. (jalgaon ssc hsc admission process start in district )

व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. शासनाच्या https://www.barti.com किंवा https://ccvis.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधिताने समितीला ऑफलाइन प्रस्तावही देणे अपेक्षित आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा राज्य बोर्डाचा निकाल मेअखेर जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेशासाठी तथा शिक्षणासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आताच काढून घ्यावीत. जेणेकरून प्रवेश घेताना धावपळ होणार नाही. पर्यायाने शैक्षणिक नुकसान टळेल. ( latest marathi news )

admission
SSC-HSC Exam 2024 : अडवणूक करणाऱ्या शाळांवर कारवाई; परीक्षा फॉर्म न भरणे, हॉलतिकीट न देण्याच्या तक्रारी

दुसरीकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करतात. त्यांनीही कागदपत्रे काढून घ्यावीत. अनेक कागदपत्रांची मुदत ३१ मार्चपर्यंतच असते. त्यामुळे सध्या आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांची मुदत संपली की नाही, याची त्यांनी खात्री करावी. नाहीतर ऐनवेळी हे दाखले घेण्यासाठी दलालांच्या माध्यमातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारावे लागतात. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी वेळेतच विविध शैक्षणिक दाखले काढणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांसह पालकांचे होतात हाल

लोकशाहीमध्ये लोकांच्या अस्तित्वाला महत्त्व असते. मात्र, प्रशासनाच्या प्रक्रियेत बऱ्याच वेळा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थीसह पालक नियमानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करतात. ती कामे बऱ्याच वेळेस पेंडिंग राहतात. मात्र, दलालामार्फत कामे केल्यास अथवा वजन ठेवल्यास याच कागदपत्रांना गती मिळते अन्‌ ही दाखले लवकर मिळत असल्याचा अनुभव येत असतो.

दलालांचा सुळसुळाट होणार नाही. विद्यार्थ्यांसह पालकांचे हाल अपेष्टा होणार नाहीत, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सूज्ञ पालकांनी व्यक्त केली आहे. शैक्षणिक कागदपत्रांसाठी प्रशासनाने एक स्वतंत्र खिडकी अथवा स्वतंत्र कक्ष निर्माण केल्यास या सर्व गोष्टींना आळा बसणार आहे.

admission
CBSE SSC HSC Result : महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के, तर बारावीत ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

*उत्पन्नाचे प्रमाणपत्र (एक किंवा तीन वर्षांचे)

*अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल)

*राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

*जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र

*ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (मुदत एक वर्ष असते)

*एसईबीसी (कुणबी नोंद न सापडलेल्यांसाठी)

*नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (मुदत तीन वर्षे असते)

*केंद्र शासन जात प्रमाणपत्र (मुदत एक वर्षाची असते)

*भूमिहीन किंवा शेतमजूर प्रमाणपत्र

*अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र

*शेतकरी प्रमाणपत्र

*एसईसी (कायम रहिवासी प्रमाणपत्र) व रहिवासी प्रमाणपत्र

admission
SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.