Khanderao Maharaj Yatrotsav : येळकोट येळकोट जय मल्हार..! फैजपूरला खंडोबा यात्रेस प्रारंभ

Khanderao Maharaj Yatrotsav : महाआरती व अभिषेक पूजा तसेच विधिवत पूजा करून शेकडो भाविकांनी ‘येळकोट- येळकोट जय मल्हारचा गजर करत यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.
Shri Malhari Martand Mahaabhishek Pooja, Purushottam Das Maharaj and devotees during Mahaarti.
Shri Malhari Martand Mahaabhishek Pooja, Purushottam Das Maharaj and devotees during Mahaarti.esakal
Updated on

फैजपूर : येथील मल्हारी मार्तंड खंडोबा यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाआरती व अभिषेक पूजा तसेच विधिवत पूजा करून शेकडो भाविकांनी ‘येळकोट- येळकोट जय मल्हारचा गजर करत यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि खान्देशातील प्रतिजेजूरी म्हणून ओळख असलेल्या खंडोबा यात्रोत्सवाला सालाबादप्रमाणे रविवार (ता.२४) पासून फाल्गुन शुद्ध पौणिमेला संध्याकाळी महामंडलेश्वर जनार्दन महाराज, गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज. (Jalgaon Start of Khandoba Yatra in Faizpur)

राममनोहर दास, पवनदास महाराज संत महंतांच्या हस्ते महाआरती करून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी सायंकाळी पाचला मान्यवरांच्या हस्ते देवस्थानातील जागृत अश्वारूढ खंडोबाराया, म्हाळसाई व बाणाई माता यांच्या मूर्तीला फुलांच्या माळा अर्पण करून सर्वांनी आरती केली. सायंकाळी मंत्री गिरीष महाजन, आमदार शिरिष चौधरी, अमोल जावळे, डॉ. केतकी पाटील, धनंजय चौधरी, नरेंद्र नारखेडे.

पांडुरंग सराफ, नंदकिशोर महाजन, डॉ. व्ही.आर.पाटील, प्राचार्य डॉ राजेंद्र वाघूळदे, आदी उपस्थित होते. तत्पूर्वी पांडुरंग सराफ, दोधू बोरोले, शशिकला बोरोले, डॉ. नितीन महाजन, संगीता महाजन, डॉ. अमित हिवराळे. (latest marathi news)

Shri Malhari Martand Mahaabhishek Pooja, Purushottam Das Maharaj and devotees during Mahaarti.
Jalgaon News : दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षेनंतर ‘परीक्षा’

डॉ. मृणालिनी हिवराळे, वसंतसिंग परदेशी, अनुराधा परदेशी, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, सोनाली राजपूत यांच्या हस्ते श्री मल्हारी मार्तंड महाअभिषेक पूजा, महाआरती व भंडारा उधळण उत्साहात पार पडला.

यात्रोचे योग्य नियोजन

दरम्यान खंडोबाच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा म्हणून पाणीपुरवठा, औषधोपचारासाठी आरोग्य पथक, साफसफाईवर अधिक भर दिला आहे. त्याचप्रमाणे रहदारीच्या ठिकाणी बॅरिकेट लावून कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. यात्रोत्सव परिसरात नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे.

Shri Malhari Martand Mahaabhishek Pooja, Purushottam Das Maharaj and devotees during Mahaarti.
Jalgaon Holi Festival : रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा करा वापर : तज्ज्ञांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.