Nepal Bus Tragedy : नेपाळमधील काठमांडू येथील नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात २७ भाविक ठार, तर १६ भाविक जखमी झाले होते. शनिवारी (ता. २४) मृत भाविकांवर शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार झाले होते. या दुर्देवी घटनेला शुक्रवारी (ता. ३०) आठवडा उलटला. मात्र, परिवार सावरला जात नसल्याचे वास्तव आहे. काठमांडू रुग्णालयातून मुंबईतील बॉम्बे आणि ब्रीच कॅण्डी हॉस्टिटलमध्ये जखमींना हलविले होते. (Still grieving Nepal bus accident week passed )