Jalgaon Band Hindu Morcha : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद आज उत्तर महाराष्ट्रात उमटले. शहरासह जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. यादरम्यान, शहरात मोर्चा निघालेला असताना दुचाकीच्या खुल्या शोरूमवर झालेल्या दगडफेकीत दुकानाच्या दरवाजाची काच फुटून नुकसान झाले.
त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. नाशिकमध्ये बंददरम्यान दुकाने बंद ठेवण्यावरून वाद निर्माण होऊन तणावाची स्थिती झाली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांविरोधात लाठीमार व अश्रूधुराचे नळकांडे फोडत स्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, धुळ्यात शिरपूर तालुका वगळता उद्या (ता. १७) बंद पाळण्यात येणार आहे. (Stone pelting during Band Hindu Morcha)