Jalgaon News : बियाण्यांची ज्यादा दरात विक्री थांबवा; महाराष्ट्र शेतकरी संघटना आक्रमक

Jalgaon : तालुक्यात बी-बियाणे आणि रासायनिक खतांवर ‘लिंकिंग’ होत असून, कृषी केंद्र चालकांकडून शासकीय किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे.
Sunil Devre along with the officials of Farmers Association while giving a statement to Naib Tehsildar Anil Patil.
Sunil Devre along with the officials of Farmers Association while giving a statement to Naib Tehsildar Anil Patil.esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यात बी-बियाणे आणि रासायनिक खतांवर ‘लिंकिंग’ होत असून, कृषी केंद्र चालकांकडून शासकीय किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. अशा कृषी केंद्र चालकांवर कारवाई करून मुबलक प्रमाणात प्रमाणित खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवासी तहसीलदार अनिल पाटील व कृषी अधिकारी पंचायत समिती दिनेश कोते यांना महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. ( Stop sale of seeds at high prices Maharashtra Farmers Association is aggressive )

निवेदनात म्हटले आहे, की तालुक्यात बी-बियाणे आणि रासायनिक खतांवर लिंकिंग होत असून, कृषी केंद्र चालकांकडून शासकीय किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत आहे. अशा कृषी केंद्र चालकांवर कारवाई करून मुबलक प्रमाणात प्रमाणित खते व बियाणे उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मागील वर्षाचा अनुभव पाहता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसली.

मागील वर्षी आमच्या संघटनेने निवेदन, आंदोलन, तक्रार अर्ज, कृषी केंद्रचालक यांच्या दुकानावर भेटी देऊन शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याबाबत सूचना दिल्यात, अशा विविध माध्यमातून लूट थांबविण्याचा सकारात्मक कार्य केले आहे, हे शासन जाणून आहे. परंतु पुन्हा आता वरीलप्रमाणे प्रकार घडत असून, शेतकऱ्यांना काही विशिष्ट जातीचे वाण हे खूपच चढ्या दराने विक्री करताना दिसत आहे.

यावर संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शासन दरबारी तक्रारी केल्या असून, त्यांच्याकडे पुरावे मागण्यात येत आहे. जर हे सर्व आम्ही शेतकरी, महाराष्ट्र शेतकरी संघटना यांनी द्यावे तर शासकीय अधिकाऱ्यांनी काय कार्य करावे? असा प्रश्न उपस्थित होतो, असेही निवेदनात म्हटले आहे. (latest marathi news)

Sunil Devre along with the officials of Farmers Association while giving a statement to Naib Tehsildar Anil Patil.
Jalgaon News : पारोळ्यातील हातपंप दुरुस्तीकडे नगरपरिषदेची पाठ

आदेशाची पायमल्ली

जिल्हाधिकाऱ्यांनी २० मे रोजी काढलेल्या परिपत्रकाचे पालन होताना दिसत नाही. ज्या दुकानावर शासकीय अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली तरी तेथे ज्यादा दराने विक्री होत आहे तर मग ते अधिकारी काय करीत आहेत. शासनाने असे कोणतेही कृत्य कृषी केंद्र चालकाकडून होणार नाही, याची दक्षता घ्यावी; अन्यथा महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून २८ मेस तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, कार्याध्यक्ष गुलाब पाटील, तामसवाडीचे शाखाध्यक्ष भय्या पाटील, सारवे शाखाध्यक्ष नितीन पाटील, मेहू शाखाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून, शेतकरी उपस्थित होते.

''कृषी केंद्रचालक जर लिंकिंग करून जादा दराने विक्री करीत असतील किंवा बॅग शिल्लक नाही तसेच शासकीय संपर्क अधिकारी त्या दुकानावर नसेल तर शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये चित्रिकरण करावे करावी व ते संघटनेला पाठवावे. संघटना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे.''- सुनील देवरे, शेतकरी नेते

Sunil Devre along with the officials of Farmers Association while giving a statement to Naib Tehsildar Anil Patil.
Jalgaon News : फैजपूरच्या दिव्यांग दांपत्याची हंडाभर पाण्यासाठी भटकंती! विठ्ठल मंदिर भागातील समस्येकडे पालिकेचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.