Jalgaon News : विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू; मनवेल आश्रमशाळेतील घटना

Jalgaon : तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आश्रमशाळेतील नऊवर्षीय विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला.
dead
dead esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आश्रमशाळेतील नऊवर्षीय विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ५) सकाळी घडली. विद्यार्थ्याचा मृतदेह संतप्त जमावाने ग्रामीण रुग्णालयातून थेट एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात नेला, तर येथे आमदार शिरीष चौधरी यांनी संतप्त जमावाची समजूत काढली व मृतदेह विच्छेदनासाठी जळगावला हलविला. (Student dies due to dizziness incident in Manvel Ashram School )

या घटनेप्रकरणी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाईसह मनवेल शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मनवेल (ता. यावल) येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत फुलसिंग पहाडसिंग बारेला (वय ९, रा. हिंगोणा, ता. यावल) हा विद्यार्थी तिसरीत शिक्षण घेत होता. शाळेत सोमवारी (ता. ५) सकाळी चक्कर आल्याने तो जमिनीवर कोसळला. हा प्रकार निदर्शनास येताच शिक्षकांनी तातडीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले.

येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणीनंतर या बालकास मृत घोषित केले. नऊवर्षीय आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समजताच तालुक्यात खळबळ उडाली. अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यात राष्ट्रवादी अजित पवार गट व मनसेच्या कार्यकर्त्यांसह आदिवासी बांधवांनी बालकाचा मृतदेह थेट येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात नेला व अधिकारी वर्गास बालकाच्या मृत्यूप्रकरणी जाब विचारला.

संबंधित घटनेची माहिती मिळताच आमदार शिरीष चौधरी, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील यांनी जमावाची समजूत काढली व प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दोषींवर कारवाईसह मनवेल शाळेच्या चौकशीचे आदेश काढले. त्यानंतर जमाव माघारी फिरला. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, उपनिरीक्षक मुजफ्फर खान यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

dead
Jalgaon News : दुर्मिळ ‘कान्होपात्रा’ वेलीचे वारकरी संप्रदायात महत्त्व; प्रत्येक गाव पंढरी मानून हरितवारीत लागवड

या प्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट व्हावे, यासाठी जमावाच्या मागणीनुसार सायंकाळी विद्यार्थ्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

मनवेल शाळेची तपासणी

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभागाकडून तातडीने मनवेल येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच विशेष पथकाकडून शाळेतील भोजन कक्षासह संपूर्ण शाळेची सखोल तपासणी करण्यात आली.

विद्यार्थी रविवारपासून आजारी

फुलसिंग बारेला या विद्यार्थ्याची प्रकृती रविवारी खराब होती. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा त्याची तब्येत खालावली व चक्कर येऊन तो कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.

dead
Jalgaon News : रेल्वे बोगींचे डिजिटल बोर्डस् कार्यान्वित करण्याची मागणी; रावेर स्थानकावर बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.