Jalgaon News : शिरसोली रोडवरील रायसोनी इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. प्रथमसत्राचे त्याचे दोन विषय राहिले असल्याची माहिती समोर आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. विश्वंभर रत्नाकर खडके (वय २१, रा. ग्रामसेवक कॉलनी, नगर रोड, बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. (algaon student took an extreme step in hostel of Raisoni)
विद्यार्थ्यांकडून प्राप्त माहितीनुसार, विश्वंभर खडके हा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन (ENTC) विद्या शाखेच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याचे गेल्या सत्रात दोन विषय राहिले होते. सोमवारी (ता. २६) महाविद्यालय झाल्यावर तो वसतिगृहातील त्याच्या खोली क्रमांक ४९ मध्येच थांबून होता.
त्याचे रूममेट आणि इतर मित्र नेहमीप्रमाणे सायंकाळी खोलीच्या बाहेर निघाले. खोलीत कोणीही नसताना विश्वंभर याने छताला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खोलीत सोबत राहणारा विद्यार्थी शिवमसिंह राजपूत हा खोलीत आला. दार आतून बंद होते. त्याने धक्का मारून दार उघडले अन् त्याला विश्वंभर हा छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्याने आरडाओरड केल्यावर शेजारील खोल्यांतून इतर विद्यार्थी धावत तिथे पोचले. तत्काळ त्यांनी होस्टेल रेक्टर आणि महाविद्यालय प्रशासनाला माहिती दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याला माहिती मिळताच त्यांनी महाविद्यालयाच्या वसतिगृहात येऊन विश्वंभरचा मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला.
पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्या रूममेटसह इतर विद्यार्थी आणि शिक्षकांची विचारपूस केली. रात्री उशिरा या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.
सकाळी शवविच्छेदन
विश्वंभर खडके या तरुणाच्या कुटुंबीयांना आणि पालकांना सायंकाळीच घटनेची माहिती दिल्याने ते जळगावी येण्यासाठी रवाना झाले आहेत. सकाळी मृतदेहाचे विच्छेदन करण्यात येऊन पालकांना सोपविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विश्वंभरचे वडील खासगी नोकरी करत असून, आई रंजना या गृहिणी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.