Jalgaon Summer Heat : भरउन्हाळ्यात विद्यापीठाच्या परीक्षा! अनेक विद्यार्थ्यांची दांडी

Summer Heat : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सध्या सुरू आहेत.
Students walking home from the sun after the paper.
Students walking home from the sun after the paper.esakal
Updated on

Jalgaon Summer Heat : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सध्या सुरू आहेत. या उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक प्रचंड उन्हाच्या काळात आल्यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खानदेश हा प्रचंड उष्णतेचा असा प्रदेश आहे, येथील तापमान हे महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत नेहमीच जास्त असते. भुसावळसारखे ठिकाण तर सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून नोंदले गेलेले आहे. ()

अशी परिस्थिती असताना विद्यापीठाने मात्र, या कडक उन्हात विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित केलेल्या आहेत. यावर्षी मे महिना हा ४२ डिग्री ते ४४ डिग्री यादरम्यानच्या तापमानात राहिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणे असह्य होत आहे. बरेच विद्यार्थी उन्हामुळे आजारी आहेत, तर काही विद्यार्थी हे प्रचंड तापमान असल्यामुळे परीक्षेला गैरहजर आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गैरहजर असल्याचे दिसून आले.

प्रत्येक राज्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा कालावधी हा वेगवेगळा असतो, ज्या भागांत जी आपत्ती असते, त्या वेळेनुसार त्या सुट्ट्या दिल्या जातात. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी जास्त असते. त्यामुळे त्यांना हिवाळ्याच्या काळामध्ये या सुट्ट्या दिलेले असतात आणि तेथील उन्हाळ्यामध्ये तिथल्या परीक्षा होतात. आसाम, मणिपूर भागामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे पावसामध्ये त्या भागामध्ये सुट्टी असतात. (latest marathi news)

Students walking home from the sun after the paper.
Summer Heat : एप्रिल महिना ठरला सर्वाधिक उष्ण ; ‘सी-३ एस’चा अहवाल,सलग अकराव्या महिन्यात उच्चांकी तापमान

त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ऊन जास्त पडत असल्यामुळे इथे एक मे हा शाळा आणि महाविद्यालयाचा शेवटचा दिवस असतो. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी यानंतर सुट्ट्या जाहीर केलेल्या असतात. कोरोनाच्या आधीपर्यंत मे महिन्याच्या पाच ते सहा तारखेपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा असायच्या, नंतर विद्यार्थ्यांसाठी त्या सुट्ट्या जाहीर केल्या जायच्या. परंतु, यावर्षी विद्यापीठाच्या परीक्षा दहा जूनपर्यंत घेण्यात येत असल्याचे समजले. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण द्यायचे आहे की त्यांना आजारी पाडायचे आहे, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठात नियोजनाचा अभाव आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड या विद्यापीठांचे नियोजन सुरळीत असते. याच विद्यापीठाला नियोजन का करता येत नाही, असाही प्रश्न काही प्राध्यापकांनी विचारला आहे.

''मी आंचळगाव येथून पेपर द्यायला येतोय. कधीच बस वेळेवर राहत नाही. आज दोन वाजता पेपर संपलाय चार वाजले, तरी गाडीची वाट बघतोय अजून गाडी आलेली नाही. इथून गेल्यानंतर शेतातसुद्धा काम करावे लागते. उन्हाळ्यात परीक्षा असल्यामुळे सर्व नियोजन कोलमडलेले आहे. मी पण तीन दिवसांपासून उन्हामुळे आजारी आहे, पण परीक्षा द्यायला येतोय.''-अविनाश चव्हाण, विद्यार्थी, आंचळगाव.

Students walking home from the sun after the paper.
Jalgaon Summer Heat : जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान 44 अंशांवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.