Jalgaon Success Story : चिकन विक्री करणारा झाला तलाठी अन् आरोग्यसेवक

Jalgaon Success Story : चिकन, मटण विक्री करणाऱ्या युवकाने सरकारी नोकरी लागण्याचे स्वप्न उराशी बाळगले जिद्द आणी मेहनतीच्या जोरावर त्याने ते पूर्ण केले उत्राण येथील फिरोज खाटीक ची कहाणी आहे.
Feroze Khatik
Feroze Khatikesakal
Updated on

Jalgaon Success Story : येथील चिकन, मटण विक्री करणाऱ्या युवकाने सरकारी नोकरी लागण्याचे स्वप्न उराशी बाळगले जिद्द आणी मेहनतीच्या जोरावर त्याने ते पूर्ण केले उत्राण (ता. एरंडोल) येथील फिरोज खाटीक ची कहाणी आहे. घरात सहा जणांचे कुटुंब आई वडील लहान भाऊ व पत्नी घरात अठरा विश्व् दारिद्र्य. घरचा मोठा असल्याने घर चळविण्याची जबाबदारी वडिलोपार्जित चिकन मटण विक्रीचा व्यवसाय इच्छा नसताना करावा लागत होता. (Jalgaon Success Story)

तेव्हा घरचा गाडा चालत असे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कशीतरी बारावी पूर्ण केली. परिस्थिती हलकीची असतानाही रायसोनी कॉलेज जळगाव ला एम. बी.ए. केले. परंतु उराशी स्वप्न होते सरकारी नोकरी मिळविण्याचे.

चिकन विक्रीचा व्यवसाय व घर चालवितांना कुठलाही क्लास न लावता अभ्यास चालू होता सातत्य ठेवले मागील दोन तीन वर्षांपासून परीक्षेत अनुत्तीर्ण होत होता परंतुनियतीला हे मान्य नव्हते २०२३ मध्ये तलाठी, आरोग्यसेवक पदाची जाहिरात निघाली. (latest marathi news)

Feroze Khatik
Jalgaon Holi Festival : ‘दुर्गूणां’चे दहन करीत होळी पारंपरिक पद्धतीने साजरी

त्याने परीक्षा दिल्या त्यात तो तलाठी, आरोग्यसेवक एकाच वेळेस दोन्ही परीक्षेत यश संपादन केले. गावातील एका वेळेस दोन परीक्षेत पास होणारा गावातील हा पाहिला ठरला.

एरंडोल पंचायत समितीचे माजी सदस्य भागवत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यश मिळविण्यासाठी सातत्य कायम ठेवावे यश नक्कीच मिळते असे फिरोज ने सकाळशी बोलताना सांगितले.

Feroze Khatik
Jalgaon News : पाणीचोरी करणाऱ्यांच्या मोटारी जप्त; पाचोरा पालिकेची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.