Success Story : परिस्थितीचा डोंगर पार करून गाठले यशाचे शिखर! आरोग्य खात्यात मिळाली नोकरी; वरखेडे येथील रवींद्र जगतापचे यश

Latest Jalgaon News : २०२३ मध्ये आरोग्य विभागाची परीक्षा दिल्यानंतर त्यात त्याने यश मिळविले. त्याची नियुक्ती वसईच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कक्षात झाली आहे.
Ravindra Jagtap
Ravindra Jagtapesakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : नियतीने टाकलेले उलटे दान, परिस्थितीने निर्माण झालेली हतबलतेची स्थितीवर आई, भाऊ आणि मित्रांनी दिलेला मदतीचा हात स्वीकारत यशाचे शिखर गाठणाऱ्या वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र जगताप याला आरोग्य खात्यात नोकरी मिळाली. आई आणि भावाचे ऋण या जन्मात फिटणार नाही. मात्र, मित्रांनी केलेली मदत पहिल्याच वेतनात फेडून या मित्रांप्रती आदरही रवींद्रने व्यक्त केला. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Success Story Ravindra Jagtap from Varkhede)

वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र अर्जुन जगताप पाच वर्षांचा असतानाच त्याचे पितृछत हरपले. त्यानंतर आई व त्याच्या मोठ्या भावाने दुसऱ्याच्या शेतात पोटाला चिमटे देऊन मोलमजुरी केली. कालांतराने तो स्वतःही कामाला जात होता. अडचणींवर मात करून आई व भावाने चेतनला परिस्थिती नसतानाही एम.एस्सी (केमेस्ट्री)पर्यंत शिकविले.

लहान भावासाठी मोठ्या भावाने स्वतः शिक्षण सोडले व त्यालाच घडवले. रवींद्रला नोकरी लागावी, यासाठी आई, भावासह मित्रांनीही त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. मित्रांनी तर आर्थिक मदतही केली. चेतनला मात्र अपयश येत होते. तो त्याच्या उंची अभावी सैन्यदलात भरती होऊ शकला नाही. रेल्वेत भरती होण्याचे त्याचे स्वप्न असून त्यासाठीही त्याने अर्ज केलेला आहे. (latest marathi news)

Ravindra Jagtap
Success Story: सिन्नरच्या सुहानीची १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड; BCCIच्या सामन्यांमध्ये करणार प्रतिनिधित्व

कागदपत्रांची चोरी

हैदराबाद येथे एका खासगी कंपनीतक मित्रांनी केलेल्या मदतीने रवींद्र इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असताना त्याच्या मूळ कागदपत्रांची फाईल व मोबाईलची रेल्वेतून चोरी झाली. त्यामुळे तो प्रचंड खचला. मात्र, आई व भावाने रवींद्रला त्याचे हरवलेले कागदपत्र मिळवून देण्यासाठी बळ दिले. मित्रांनीही आर्थिक सहकार्य केल्याने सर्व कागदपत्रे नव्याने प्राप्त केली.

२०२३ मध्ये आरोग्य विभागाची परीक्षा दिल्यानंतर त्यात त्याने यश मिळविले. त्याची नियुक्ती वसईच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कक्षात झाली आहे. आपल्या मुलाच्या यशाने आईला आनंदाश्रू गगनात मावेनासे झाले होते. आपल्या कष्टाला यश आल्याचे समाधान आई व भावाच्या चेहऱ्यावर दिसत होते.

"जीवनात अपयश आले, तरी खचून जाऊ नका. कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश नक्कीच मिळते. त्यातून आर्थिक संकटावरही मात करता येते. मोबाईलचा योग्य तेवढाच वापर करावा. मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच करावा. अतिरिक्त मोबाईल वापर टाळावा. या यशामागे भाऊ, आई व मित्र परिवाराचा मोठा वाटा आहे. माझे शिक्षक अमोल जाधव यांचेही मला मार्गदर्शन लाभले."- रवींद्र जगताप, वरखेडे (ता. चाळीसगाव)

Ravindra Jagtap
Success Story: शेतकऱ्याच्या मुलांनी नाव कमावले नाव; मेहनतीच्या जोरावर बहिण भावांनी मिळवली खाकी वर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.