Jalgaon Summer: उष्णलाटांमुळे केळीची झाडे उन्मळून पडली! शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी; माचले शिवारात 6 एकरावरील बागेचे नुकसान

Jalgaon News : वाढत्या तापमानामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात जनतेच्या काळजी पोटी कलम १४४ लागू केले आहे,
Uprooted banana trees in a field at Machle (T. Chopra).
Uprooted banana trees in a field at Machle (T. Chopra).esakal
Updated on

चोपडा : राज्यासह जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. या तापमानवाढीने, उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. झाडांचे पाणी कमी होते. विपरित परिणाम झाडांच्या वाढीवर व घड पोसण्यावर होतो, वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात.

शिवाय केळी बागेतील झाडे उन्मळून पडतात. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील माचले शेतशिवारातही शनिवारी (ता.२५) संध्याकाळी घडला. त्यात सहा एकरावरील केळीची झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. (Jalgaon Banana Damage to 6 acres of garden in Machle Shiwar)

माचला येथील शेतकरी चंद्रशेखर पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांची शेती भागीदाराने केलेली आहे. या शेतामध्ये दोन दिवसांपासून झालेल्या वादळीवाऱ्यामुळे जवळपास सहा एकर नवती केळी बाग, ऐन कापणीवर आलेली बागेतील झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले.

सहा एकर क्षेत्रात आठ हजार ७०० केळी रोपांची लागवड केलेली होती. त्यामुळे अंदाजित साधारणपणे नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान केळी बाग पडल्यामुळे झाले आहे. नेमका हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. म्हणून महसूल विभागाने तातडीने या नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (latest marathi news)

Uprooted banana trees in a field at Machle (T. Chopra).
Nashik Lemon Rate Hike : नागरिकांना उन्हासह महागाईचे चटके! आरोग्यासाठी बहुगुणकारी लिंबाचे भाव कडाडले

"वाढत्या तापमानामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात जनतेच्या काळजी पोटी कलम १४४ लागू केले आहे, जेणेकरून नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये व त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये. परंतु, शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभी केलेली केळी बागा उन्हामुळे खराब होत आहेत, त्यासाठी काय. केळी बागेचादेखील विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, असा विचार जिल्हाधिकारी यांच्याकडून झाला पाहिजे."

- डॉ. रवींद्र निकम, प्रगतिशील शेतकरी, माचला.

Uprooted banana trees in a field at Machle (T. Chopra).
Jalgaon: ग्राहक वाढले, विजेची मागणी वाढली...यंत्रणा तीच! आपत्कालीन भारनियमन; 10 वर्षांत ना उपकेंद्र वाढले, ना अपग्रेडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.