Jalgaon Summer Heat: कपाशीच्या अंकुरांनी टाकल्या माना! चोपडा तालुक्यातील स्थिती; पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

Jalgaon News : काही ठिकाणी मृगाचा पाऊस वेळेवर सुरू झाल्याने आपल्याकडेही पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या.
destroyed cotton buds
destroyed cotton buds esakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड झाली आहे. काही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पाऊस येईल, या आशेवर पेरणी केल्यामुळे ही पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कपाशीच्या निघालेल्या अंकुरांनी कडक उन्हामुळे माना टाकल्या आहेत. (Jalgaon Status cotton crop in Chopra Taluka)

काही ठिकाणी मृगाचा पाऊस वेळेवर सुरू झाल्याने आपल्याकडेही पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या. काही भागात मृग नक्षत्राअगोदरच धूळपेरणीची पद्धत आहे. त्या ठिकाणीही बियाणे जमिनीत टाकले गेले. मोठ्या प्रमाणावर खर्च करून मका, मूग आदी पिके पेरली गेली.

मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतित सापडले असून, त्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या व पिके उगवली असली, तरीही मृग नक्षत्रातही पावसाऐवजी कडक ऊन पडत असल्याने उगवलेले पिकांचे अंकुर माना टाकू लागले आहेत.

एकाच वेळेला एवढे पीक वाचविणे शक्य नाही, म्हणून शेतकऱ्यांनी आता विहिरी व कूपनलिकांच्या पाण्यावर पीक वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. चोपडा तालुक्यात ही स्थिती असली, तरी खानदेशातील अर्ध्या अधिक भागात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. (latest marathi news)

destroyed cotton buds
Nashik News : जि. प.च्या विद्यार्थ्यांना गणवेश, आदिवासींना पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा

हंगाम चांगला येईल, १०१ टक्के पाऊस होईल, असे भाकीत व अंदाज वर्तविले जात असताना, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. येत्या २१ जूनपासून आद्रा नक्षत्र सुरू होत आहे. या वर्षाच्या खरिपाच्या पेरण्या आद्रा नक्षत्रातच होतील, असा अंदाज बांधला जात आहे.

पावसाचे दिवस असताना, पावसाळ्यातही कडक ऊन पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी महागडी खते, बियाणे जमिनीत टाकली असून, ती व मेहनत वाया जाणार आहे. काही ठिकाणी दुबार पेरण्या, तर काही ठिकाणी पेरणीला उशीर होणार आहे. एकंदरित पाहता या वर्षीचा खरीप हंगाम खानदेशी भाषेत चकल बकल झाल्याचे सूर आता उमटू लागले आहेत.

destroyed cotton buds
Malnourished Children : कुपोषित बालकांची संख्या 2 महिन्यांत घटली! स्तनपान, पोषण कार्यक्रम व सुरगाणा पॅटर्न यशस्वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.