Jalgaon Summer Heat : जामनेर तालुक्यात उष्माघाताच्या रुग्णात वाढ; तापमान वाढीमुळे काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन

Jalgaon News : तालुक्यात सर्वत्र उष्णतेची लाट आहे. जवळपास ४५ डिग्री पर्यंत तापमानात वाढले असून प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघात सदृश रुग्णांची संख्या वाढली आहे.
Dr. Vinay Sonawane while being treated in the heat stroke ward of Upazila Hospital.
Dr. Vinay Sonawane while being treated in the heat stroke ward of Upazila Hospital.esakal
Updated on

जामनेर : तालुक्यात सर्वत्र उष्णतेची लाट आहे. जवळपास ४५ डिग्री पर्यंत तापमानात वाढले असून प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघात सदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहान वैद्यकिय तज्ञांनी केले आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांत उष्माघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. (Jalgaon Summer Heat Increase in heat stroke patients in Jamner taluka)

त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे,घट्ट कपड्याचा वापर करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. त्याची काळजी घ्यावी असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ विनय सोनवणे यांनी केले आहे.

उष्माघाताची लक्षणे

थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे,भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे,रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी लक्षण दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षण दिसू लागताच, रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे रुग्णाचे तापमान खाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत. (latest marathi news)

Dr. Vinay Sonawane while being treated in the heat stroke ward of Upazila Hospital.
Jalgaon News : बेशुद्ध उपनिरीक्षकाचा जळगावात मृत्यू!

रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या, आवश्यकतेनुसार सलाईन देणे. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करावा.

पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये थांबून नियमित आराम करावा गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.

तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत जामनेर उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत सुविधा उपलब्ध असून जामनेर शहर व परिसरातील रुग्णांनी अद्ययावत सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ विनय सोनवणे यांनी केले आहे.

Dr. Vinay Sonawane while being treated in the heat stroke ward of Upazila Hospital.
Jalgaon Lok Sabha Election : भाजप प्रवेशानंतरही खडसेंची ‘आमदारकी’ राहणार; शरद पवारांची हमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.