Jalgaon Summer Heat : जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान 44 अंशांवर

Jalgaon News : शहरासह जिल्ह्याचे बुधवारी (ता. १७) तापमान ४४.५ अंशांवर पोचले. सकाळी दहापासूनच उष्णता जाणवत होती. रस्त्यावरून जाताना अक्षरश: उष्णतेच्या वाफा.
Temperature
Temperature esakal
Updated on

Jalgaon News : शहरासह जिल्ह्याचे बुधवारी (ता. १७) तापमान ४४.५ अंशांवर पोचले. सकाळी दहापासूनच उष्णता जाणवत होती. रस्त्यावरून जाताना अक्षरश: उष्णतेच्या वाफा अंगाला झोंबत होत्या. दुपारी अनेक रस्ते निरमनुष्य झाले होते. उष्णतेची लाट २० एप्रिलपर्यंत राहण्याचा असल्याचा अंदाज वेलनेस वेदर फाउंडेशनने व्यक्त केला आहे. (Jalgaon Summer Heat wave in district Temperature at 44 degrees)

एप्रिलमध्ये काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. बुधवारी तापमानाने उच्चांक गाठत ४४.५ अंश पार केले. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठांमध्ये दुपारी शुकशुकाट दिसू लागला आहे. कामानिमित्त बाहेर निघालेले माणसे दुपारी सावली शोधू लागली आहेत. शीतपेयांना मागणी वाढली आहे. सायंकाळनंतर रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत आहे.

तालुकानिहाय तापमान असे

तालुका- अंश सेल्यिअस

जळगाव ४४.५

भुसावळ ४४.५

Temperature
Jalgaon Girish Mahajan : खासदारकीत काम चांगले; मग उमेदवारी का नाही? : गिरीश महाजन

अमळनेर ४४.५

बोदवड ४३.७

भडगाव ४४

चोपडा ४३

चाळीसगाव ४३

धरणगाव ४४

एरंडोल ४४.५

फैजपूर ४३.५

जामनेर ४४.५

मुक्ताईनगर ४४.५

पारोळा ४३.५

पाचोरा ४४

रावेर ४४.५

वरणगाव ४४.५

यावल ४४

"उष्णतेची लाट जळगाव जिल्ह्यात आली आहे. येत्या २० एप्रिलपर्यंत ती कायम राहील. नागरिकांनी दुपारी बारा ते सायंकाळी पाचदरम्यान महत्त्वाचे काम असेल, तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घरात थांबावे व सतत पाणी प्यावे." - नीलेश गोरे, अध्यक्ष वेलनेस वेदर फाउंडेशन

Temperature
Jalgaon Summer Heat : तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली; काळजी घेण्याचे वैद्यकीय विभागाचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.