Jalgaon News : पोलिस भरतीत उमेदवाराच्या पायात मायक्रो चीप : अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

Jalgaon : जिल्हा पोलिस दलातर्फे बुधवार (ता. १९)पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत आहे.
police
policeesakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा पोलिस दलातर्फे बुधवार (ता. १९)पासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या प्रक्रियेसाठी पोलिस दलाची तयारी पूर्ण झाली असून, एकूण सहा हजार ५५७ उमेदवारांनी अर्ज भरले. यंदाच्या भरतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानााचा वापर करण्यात येत आहे. उमेदवाराच्या पायाला मायक्रो चीप लावण्यात येऊन त्याद्वारे अचूक वेळेची गणना केली जाणार असल्याची माहिती जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत दिली. (Microchip in candidate leg in police recruitment )

जिल्हा पोलिस दलातर्फे यंदाच्या पोलिस भरतीची जय्यत तयारी करण्यात आलेली असून, या अनुषंगाने जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या दालनात शनिवारी पत्रकार परिषद झाली. पोलिस दलाच्या कवायत मैदानावर बुधवार (ता. १९)पासून सुरू होत असलेल्या भरती प्रक्रियेसाठी पहिल्या दिवशी ५००, दुसऱ्या दिवसापासून एक हजार उमेदवारांच्या शारीरिक आणि मैदानी चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

भरती प्रक्रियेत अचूकता यावी, मानवनिर्मित कुठलीही त्रुटी राहू नये, यासाठी पोलिस दलाचा पुरेपूर प्रयत्न असून, प्रथम उंची आणि छाती मोजूनच उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. उंची मापकांची शास्त्रोक्त तपासणी पोलिस दलाने पूर्वीच करून घेतली. अर्ज भरण्यापासूनची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असल्याने याबाबतचे वेळापत्रक, हॉल तिकीट आणि इतर सर्व माहितीचे संदेश संबंधित उमेदवाराच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठविले जात आहेत.

पहाटे साडेचारला पहिली ‘एंट्री’

भरतीच्या पहिल्या दिवशी १९ जूनला पहाटे साडेचारला उमेदवारांना वाहतूक शाखेच्या मैदानावर शामियान्यात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉल तिकीट तपासल्यावर उंची व छाती मोजली जाईल. त्यानंतर शारीरिक पात्रता चाचणी होईल. नंतर धावण्याच्या स्पर्धा व गोळाफेक घेतल्या जातील. (latest marathi news)

police
Jalgaon News: अमळनेर तालुक्यात कपाशीचे क्षेत्र घटणार! उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल; बागायतदारांकडून मृग नक्षत्राच्या आधीच पेरणी

दररोज मैदानी गुण

भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची गुणांची यादी दररोज लावली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. प्राप्त गुणांसह इतर तक्रारी व समस्यांसाठी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून ‘डीवायएसपी’ आणि दुय्यम पोलिस अधीक्षक असे मैदानावर अपील ऐकण्यासाठी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हजर राहतील.

महिलांची शेवटी चाचणी

भरती प्रक्रियेसाठी एकूण सहा हजार ५५७ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी व इतर मैदानी चाचण्या झाल्यावर मंगळवारी (ता. २५) महिला उमेदवारांच्या चाचण्यांना सुरवात होणार आहे. त्यात एक हजार ३६२ महिला उमेदवार असून, एक तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश करण्यात आला.

पावसासाठी खबरदारी

पोलिस भरतीदरम्यान पाऊस आला, तरी कुठल्याही चाचण्या खोळंबणार नाहीत, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. एक हजार ६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी खास मुरूम टाकून मैदानावरच ट्रॅक तयार करण्यात आला. पारंपरिक ट्रॅक हा वळणा-वळणाचा असल्याने यंदा मैदानावर ट्रॅक असून, प्रत्येकी ४०० मीटरचे चार राउंड (१६००) पुरुष उमेदवारांना, तर महिला उमेदवारांना दोन राउंड घ्यावे लागणार आहेत.

police
Jalgaon News : गुन्हे शाखेचे शिवधनुष्य पेलणार निरीक्षक बबन आव्हाड; चाचपणीसाठी अतिरिक्त कार्यभार

असा फौजफाटा तैनात

पोलिस अधीक्षक- १

अप्पर पोलिस अधीक्षक- २

डीवायएसपी- ५

पोलिस निरीक्षक- १०

उपनिरीक्षक- १५

पोलिस कर्मचारी- ३५०

''पोलिस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली जात असून, कोणीही चुकीच्या माहिती देणाऱ्या अथवा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये.''- डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक

मायक्रो चीप म्हणजे काय

धावण्याची चाचणी घेताना चेस्ट नंबरनुसार निवडलेल्या उमेदवारांच्या पायात मायक्रो चीप लावली जाणार आहे. संबंधित उमेदवाराने सुरवात आणि अंतिम लेन ओलांडताच त्याची अचूक वेळ संगणकात नोंद होईल. मानवनिर्मित त्रुट्या आणि चुका टाळता याव्यात, यासाठी जिल्ह्या‍त पहिल्यांदाच पोलिस भरतीत मायक्रो चीपचा वापर केला जाणार आहे.

police
Jalgaon News : शेतीच्या हिस्स्यावरून 2 गटांत हाणामारी; दहिवद शिवारातील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.