Jalgaon Missing Case: तांदलवाडीचा तरुण अमेरिकेत बेपत्ता! दूतावासाकडून प्रतिसाद नसल्याने परराष्ट्रमंत्र्यांकडे मदतीसाठी धाव

Jalgaon News : दरम्यान, तेथील पार्क रेंजर्सनी सध्या शोधमोहीम थांबविली असल्याने शोधकार्य करणाऱ्या पथकाबद्दल नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हे प्रकरण अमेरिकन सरकारकडे मांडावे, अशी विनंती केली आहे.
Siddhant Patil
Siddhant Patilesakal
Updated on

तांदलवाडी (ता. रावेर) : येथील मूळ रहिवासी व सध्या नोकरीनिमित्त अमेरिकास्थित तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. ग्लेशियर पार्कमध्ये मित्रांसोबत पहाडावर ट्रेकिंग करीत असताना त्याचा दगडावरून पाय निसटल्याने तो नदीच्या प्रवाहात पडला आणि खाडीमध्ये दिसेनासा झाला.

दरम्यान, तेथील पार्क रेंजर्नसनी सध्या शोधमोहीम थांबविली असल्याने शोधकार्य करणाऱ्या पथकाबद्दल नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हे प्रकरण अमेरिकन सरकारकडे मांडावे, अशी विनंती केली आहे. (Jalgaon Tandalwadi youth missing in America)

येथील रहिवासी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले विठ्ठल नारायण पाटील यांचा २६ वर्षीय मुलगा सिद्धांत अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील कॅडेन्स डिझाईन सिस्टिम या कंपनीत कार्यरत आहे. तो ४ जुलैला सुटीनिमित्त मित्रांसोबत अमेरिकेतील मोन्टाना येथील ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेला होता.

दरम्यान, ६ जुलैला पहाडावर ट्रेकिंग करीत असताना त्याचा दगडावरून पाय निसटल्याने तो नदीच्या प्रवाहात पडला आणि खाडीमध्ये दिसेनासा झाला. तो खाडीत पडल्यानंतर दोनवेळा दिसला, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्याचा शोध घेण्यासाठी तेथील सुरक्षा व्यवस्था तत्काळ दाखल झाली आणि शोधकार्यही सुरू झाले.

हेलिकॉप्टरसह ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेतला. परंतु पाण्याची पातळी वाढल्याने अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. तिथल्या पार्क रेंजर्नसनी सध्या शोधमोहीम थांबविली असल्याने सिद्धांत पाटील याचे पुणेस्थित मामा प्रीतेश चौधरी यांनी शोधकार्य करणाऱ्या पथकाबद्दल नाराजी व्यक्त केली. (latest marathi news)

Siddhant Patil
GST : ‘जीएसटी’ने वाढवली व्यापाऱ्यांची डोकेदुखी; लेखापरीक्षणासाठी कोल्हापूरला मारावे लागणार हेलपाटे

त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे प्रकरण अमेरिकन सरकारकडे मांडण्याची विनंती केली आहे. ते सतत सीएटलमधील दूतावासाशी बोलत आहे. पण त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

सिद्धेश २०२० मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजिल्स (यूसीएलए) मधून ‘एमएस’ची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता. २०२३ मध्ये तो कॅडेन्समध्ये रुजू झाला. सिद्धांत जिवंत असून, लवकरच सकारात्मक बातमी समोर येईल, अशी आशा त्याचे आई-वडील, मामा प्रीतेश चौधरी आणि नातेवाईक, आप्तेष्ट ठेवून आहेत.

Siddhant Patil
Jalgaon Crime : चोरीस गेलेल्या 17 लाखांच्या दुचाकी जप्त; बोदवड पोलिसांची कारवाई; एसपींकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.