Jalgaon News : ‘हतनूर’मधून क्षमतेच्या 9 पट पाणी सोडले नदीपात्रात; ‘तापी’ पूरनियंत्रणाचा जळगाव पॅटर्न

Jalgaon : यंदाच्या पावसाळ्यात वर्षी अनेक वर्षानंतर विक्रमी पावसाची नोंद झाली. यात ३ सप्टेंबर २०२४ ला हतनूर धरणाच्या २४ दरवाज्यांमधून १ लाख १८ हजार ६५८ क्यूसेक्स ऐवढे पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले.
Ongoing release of water from the dam.
Ongoing release of water from the dam.esakal
Updated on

जळगाव : यंदाच्या पावसाळ्यात वर्षी अनेक वर्षानंतर विक्रमी पावसाची नोंद झाली. यात ३ सप्टेंबर २०२४ ला हतनूर धरणाच्या २४ दरवाज्यांमधून १ लाख १८ हजार ६५८ क्यूसेक्स ऐवढे पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले. त्याच दिवशी वाघूर धरणाच्या १० दरवाज्यांमधून १६ हजार ३९३ क्यूसेक्स विसर्ग वाघूर नदीपात्रात झाला. या कालावधी दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार पूर नियंत्रणाची कार्यवाही केल्याने पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टळल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. (Tapi flood control in river basin 9 times capacity was released from Hathnoora )

दरम्यान, हतनूर धरणाची क्षमता ३८८ दशलक्ष घनमीटर अर्थात १३.७० अब्ज घनफूट (टीएमसी) असून, यंदाच्या पावसाळ्यात क्षमतेच्या नऊ पट म्हणजेच ११५ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

...अशी असते प्रक्रिया

तापी खोऱ्यात पुराच्या वेळी नद्यांवरील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांतून, सांडव्यावरून वेळोवेळी किंवा तातडीची परिस्थिती उद्भवल्यास धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदी पात्रात काही प्रमाणात पाणी सोडण्याची वेळ येते. त्यावेळेस एकाचचेळी सोडलेल्या विसर्गामुळे धरणाखालील गावांना नदी खोऱ्यातील नैसर्गिक कारणांमुळे धोका निर्माण होऊ शकतो.

मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्देशानुसार पावसाळ्यात, तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील तापी खोऱ्यातील सर्व धरणाखालील भागात पूरस्थितीचे योग्य पद्धतीने नियंत्रण करण्याच्या दृष्टीने पूर नियंत्रण अधिकारी म्हणून मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव, पूरनियंत्रण समन्वय अधिकारी, पूर नियंत्रण कक्ष म्हणून अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या अधिपत्याखालील जळगाव पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयात पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जिल्हा पूर नियंत्रण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असतात. (latest marathi news)

Ongoing release of water from the dam.
Jalgaon News : भवरखेडेतील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; 6 तासांनंतर मृतदेह काढला बाहेर

पूरनियंत्रणाची अशी होते कार्यवाही

तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे तलावांचे १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यानिमित्त दररोजच्या पाणी साठ्याची माहिती सर्व शासकीय यंत्रणेला देण्यासाठी महामंडळाने जळगाव पाटबंधारे विभागाकडेही जबाबदारी सोपविलेली आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, जामनेर यांच्यासह त्यांचे कार्यरत शाखाधिकारी यांच्या अधिपत्याखालील २४ तास तीन पाळ्यांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, संगणक परिचालक व कुशल मदतनीस पूर नियंत्रण कक्षामध्ये कार्यान्वित आहेत.

दररोज सकाळी आठला गिरणा पाटबंधारे विभाग, जळगावमार्फत प्राप्त होणाऱ्या जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लघु पाटबंधारे तलावांच्या पाणी साठ्यांची दैनंदिनी तयार करून, दैनंदिनी मंत्रालय, जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महसूल व पोलिस कार्यालय, जलसंपदा कार्यालय व सर्व संबंधित अधिकारी यांना ई-मेलद्वारे पाठविणे. दररोज १ तासाने हतनूर, वाघूर व गिरणा या मोठ्या प्रकल्पांच्या पाणी साठ्यांची नोंद पूरनियंत्रण कक्षात अद्यावत करून ठेवणे.

दररोज सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान व सायंकाळी पाच ते सहादरम्यान तापी खोरे अंतर्गत येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांची पाणीपातळी, त्या दिवसाचा पाऊस व विसर्गाबाबत मंत्रालयीन स्तरावर कार्यान्वित भ्रमणध्वनी वाॅट्सग्रुपवर, अतिरिक्त मुख्य सचिव तसेच सचिव जलसंपदा यांना देखील कळविण्याची कार्यवाही केली जाते.

पूरनियंत्रण कक्षास प्रत्येक तासाला ‘अपडेट’

हतनूरसह इतर मोठ्या धरणातून सोडण्यात येणारा पाणी प्रवाह पाच हजार क्यूसेक्सपेक्षा जास्त सोडण्यात येणार असेल तर जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणा (जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस पाटील, तलाठी) व पोलिस विभाग (पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक) पाटबंधारे विभाग, मंत्रालय स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या पूरनियंत्रण कक्षास तसेच अंतरराज्यीय प्रकल्प, उकई येथे स्थापन करण्यात आलेल्या पूरनियंत्रण कक्षास प्रत्येक तासाला दूरध्वनीद्वारे कळविण्यात येते. जळगाव येथे पुराच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या पूरनियंत्रण कक्षात कळविण्यात येते. पूरनियंत्रण कक्षासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या भ्रमणध्वनीच्या वॉट्सग्रुपवर देखील सदर आपातकालीन संदेश पाठविण्यात येतात.

Ongoing release of water from the dam.
Jalgaon News : राज्य सरकारच्या धोरणामुळे चार लाख शेतकऱ्यांवर अन्याय : उन्मेष पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.