शिक्षकांनी शिक्षकदिनी दिला आत्मदहनाचा इशारा

अन्यायग्रस्त शिक्षकांना शासनाचे आर्थिक तरतूदीसहीत त्वरीत मंजुरी देण्याची मागणी सर्व स्तरावरुन होत आहे.
mla dr sudhir tamb
mla dr sudhir tambmla dr sudhir tamb
Updated on

पातोंडा ता.अमळनेर : अनूदानित कनिष्ठ महाविद्यात सन 2003 ते 2019 पर्यंत राज्यात एकूण 1298 पदे अजूनही बिनपगारी कार्यरत आहेत. मागील सतरा वर्षांपासून सदर प्रश्न प्रलंबित असून अनेकदा निवेदने देऊन, आझाद मैदानात आंदोलने करूनही आजपावेतो शासनाकडून (Government) त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. दहा ते पंधरा वर्ष विनावेतन काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह अशक्य असल्याने हतबल झालेल्या शिक्षकांनी (Teachers) येता शिक्षकदिनी (Teacher's Day) 5 सप्टेंबरला सामूहिक आत्मदहन (Suicide) करण्याचा इशारा दिला आहे.

(jalgaon teacher teachers day suicide warning Statement by mla dr sudhir tambe)

mla dr sudhir tamb
गरिबीवर मात करून ‘प्रतीक्षा’ने आयटी क्षेत्रात यशाला घातली गवसणी

सन 2003 ते 2011 दरम्यानची व्यपगत पदे , 2010-11 पुर्वीची सर्व विभागीय उपसंचालक कार्यालयातील नजरचुकीने मान्यता राहिलेली वाढीव पदे आणि 2011 ते 2019 पावेतोची अशी एकूण 1298 पदांचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून शासन मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. मागील 16 वर्षांपासून आपल्या पदांना मान्यता मिळेल या भोळ्या आशेवर हे शिक्षक विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून विनावेतन प्रामाणिकपणे विद्यादानाचे कार्य करीत आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारे माहिती मागवून मान्यतेच्या प्रक्रियेमध्ये होत असलेल्या वेळकाढूपणाला कंटाळून हतबल झालेल्या वाढीव (पायाभुत) पदावरील शिक्षकांनी 26 जुलै रोजी संचालक कार्यालयात एकत्र येऊन 15 ऑगस्ट रोजी आपल्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधूण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच 30 ऑगस्ट पर्यंत वाढीव (पायाभुत) पदांना मान्यता मिळाली नाही तर दि. 5 सप्टेंबर शिक्षकदिनी वाढीव (पायाभुत) पदावरील शिक्षक आत्मदहन करणार असल्याचे म्हटले आहे. अनेक वर्षांपासून विनावेतन ज्ञानदानाचे कार्य करणा-या या अन्यायग्रस्त शिक्षकांना शासनाचे आर्थिक तरतूदीसहीत त्वरीत मंजुरी देण्याची मागणी सर्व स्तरावरुन होत आहे.

mla dr sudhir tamb
Photos: शहीद जवान निलेश महाजन यांना अखेरची सलामी

वाढीव (पायाभुत) पदावर कार्यरत शिक्षकांचे प्रतिनीधी म्हणून रचना कोल्हे विजया धुमाळ, सुनंदा बारटक्के, योगेश कोष्टी, राहूल मोरे, विनोद दानवे, किरण मासळकर, सोमनाथ गुंजाळ, ज्योती होळकर, सुनिल देवरे व मनोहर शिंपी आदींनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षक संचालक टेमकर, पदवीधर आमदार डाॅ. सुधीर तांबे, शिक्षक आमदार विक्रम काळे व जयंत आसगावकर यांना निवेदन दिले आहे.

mla dr sudhir tamb
जळगावकरांनो सावधान..३ ते ६ ऑगस्टदरम्यान मुसळधार पाऊस

पदवीधर व शिक्षक आमदारांची शिक्षण आयुक्त व संचालकांशी चर्चा

राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व शिक्षण संचालक टेमकर यांच्याशी पुण्यात नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे वि. प. आमदार डाॅ सुधीर तांबे , शिक्षक आमदार विक्रम काळे , आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातल्या विवीध प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील अनूदानीत वाढीव (पायाभुत) पदावरील शिक्षकांच्या व इतर प्रलंबित समस्यांबाबतचा अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याबाबत आग्रह धरण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.