Jalgaon News : शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी झटणार शिक्षक संघटना समन्वय समिती! 2 वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर

Jalgaon News : या समितीत दोन वर्षांसाठी समन्वयक तथा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे यांनी जाहीर केली.
Tulshiram Sonwane, Govinda Patil, Narayan Wagh
Tulshiram Sonwane, Govinda Patil, Narayan Waghesakal
Updated on

Jalgaon News : शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी जिल्ह्यातील प्रमुख १३ संघटनांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. तीत सर्व संघटनांच्या माध्यमातून व समन्वयातून जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविणे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती गठीत करण्यात आली. या समितीत दोन वर्षांसाठी समन्वयक तथा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे यांनी जाहीर केली. (Jalgaon Teachers Association Coordinating Committee)

यात अध्यक्षपदी नारायण वाघ, कार्याध्यक्षपदी गोविंदा पाटील, उपाध्यक्षपदी पी. बी. नरवाडे, गिरीश नेमाडे, आर. एस. पाटील, प्रभाकर बोरसे, देवेंद्र तायडे, तर सचिवपदी एस. एस. अहिरे, सहसचिवपदी आर. के. पाटील, कृष्णराव विसावे, खजिनदारपदी सुनील रमेश वानखेडे, प्रसिद्धिप्रमुखपदी प्रवीण धनगर, संजय पाटील, दिनेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती सुनीता पाटील, सुनीता खडके, कार्यकारिणी सदस्यांत संतोष कचरे, विनोद महेश्री, रवींद्र अडकमोल, विकास चौधरी, किरण पाटील, आर. जे. पाटील, किरणकुमार मगर, विनोद पाटील, गजानन कंखरे, करणकुमार सुरडकर, अमोल वाणी, बी. डी. शिरसाट, प्रदीप हिरोळे, चंद्रकांत देशमुख, संदीप मनोरे यांचा समावेश आहे.

समन्वय समितीच्या स्थापनेत शैलेंद्र (छोटू) खडके यांचेही मोलाचे योगदान व ही संघटना स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची एकमताने निवड करण्यात आली. समितीचे ज्येष्ठ सल्लागार म्हणून प्र .ह. दलाल, शुद्धोधन सोनवणे, डॉ. मिलिंद बागूल, डॉ. संजू भटकर, समाधान महाजन, किशोर राजे, आर. डी. बोरसे, पी. ए. पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. (latest marathi news)

Tulshiram Sonwane, Govinda Patil, Narayan Wagh
Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

समन्वय समितीतील सहभागी संघटना

शिक्षक भारती, राज्य शिक्षक परिषद, शिक्षक सेना, बहुजन शिक्षक शिक्षकेतर संसद, विज्ञान अध्यापक मंडळ, इस्तू संघटना, जळगाव जिल्हा खासगी शाळा शिक्षकेतर संघटना, शिक्षकेतर सेना, भाजप शिक्षक आघाडी, राष्ट्रवादी शिक्षक सेल, पदवीधर डी.एड. कला-क्रीडा शिक्षक संघ, महाराष्ट्र कलाध्यापक संघ, शिक्षक व प्रशिक्षक संघ.

"जिल्ह्यात प्रथमच प्रमुख अशा १३ संघटनांच्या माध्यमातून समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी समन्वय समिती सतत प्रयत्नशील राहणार आहे."- तुळशीराम सोनवणे

Tulshiram Sonwane, Govinda Patil, Narayan Wagh
Nitin Gadkari Jalgaon Daura : देशात रामराज्य, शिवशाही आणण्याचे ध्येय : नितीन गडकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.