Jalgaon Municipality : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नवीन सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड; नागरिकांचे हाल

Jalgaon Municipality : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने दाखले देण्याचे काम संथगतीने सुरू आहे.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
Updated on

Jalgaon Municipality : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने दाखले देण्याचे काम संथगतीने सुरू आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नवीन सॉफ्टवेअर टाकले आहे. त्यावरून जन्म-मृत्यूचे दाखले देण्याचे काम गतीने होत होते. दिवसाला किमान शंभर ते सव्वाशे दाखले देण्यात येतात. (Technical issue in new software in municipal birth and death department)

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.त्यामुळे सॉफ्टवेअर संथ गतीने चालत आहे. जन्म -मृत्यूचे डॉक्युमेंटस स्कॅन करून ते नवीन सॉफ्टवेअरवर अपलोड होत नाही. त्यामुळे एका दाखला देण्यास दोन ते तीन तास वेळ लागत आहे. (latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipality News : शौचालय, सांडपाण्याचे पाईप चेंबर्सला जोडणार; आठवड्यात सुरू होणार काम

नागरिकांना पाठवले जाते परत

जन्म-मृत्यूचे दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बिघाडामुळे विभागात येणाऱ्या अनेक नागरिकांना परत पाठविले जात आहे. दाखले देण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipality News : मनपातर्फे रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची सुविधा; जिल्हा दूध संघ भरणार शुद्ध थंड पाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.