Jalgaon Crime News : डांभुर्णी रस्त्यावरील शेतातून 21 खांबांवरील वीजतारांची चोरी

Jalgaon Crime : तालुक्यातील किनगाव -डांभुर्णी रस्त्यावरील शेतातून २१ खांबावरील लघुदाबाच्या वीजतारांची चोरी झाली आहे.
Theft of electricity
Theft of electricityesakal
Updated on

Jalgaon Crime News : तालुक्यातील किनगाव -डांभुर्णी रस्त्यावरील शेतातून २१ खांबावरील लघुदाबाच्या वीजतारांची चोरी झाली आहे. हा प्रकार शनिवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आला. तारांच्या चोरीमुळे या भागातील तब्बल ३८ शेतकऱ्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला असून, पिकाला पाणी देणे जिकरीचे झाले आहे. किनगाव (ता. यावल) येथून डांभुर्णी जाणाऱ्या रस्त्यावर सुभाष नेहेते यांचे शेत आहे. (Theft of electricity cables on 21 pole for farm on Dambhurni road )

या शेताजवळील महावितरणच्या रोहित्रापासून ते थेट मनोज महाजन यांच्या शेतापर्यंत तब्बल २१ खांब आहेत. त्यावर लघुदाबाच्या तार टाकून या भागातील ३८ शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात आले आहेत. या शेतातील २१ खांबांवरील वीज तार मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी लंपास केल्या.

Theft of electricity
Jalgaon Crime News : दाणा बाजारातील ड्रायफ्रूटचे दुकान फोडले; साडेचार लाखांची रोकड लंपास

हा प्रकार शनिवारी सकाळी शेतकऱ्यांच्या निर्दशनास आला. त्यांनी राज्य वीज वितरण कंपनीच्या लाइनमनला याबाबत माहिती दिली. याबाबत यावल पोलिसात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी विशेष मोहीम राबवीत वीजतार चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजवितरण कंपनीच्या लघुदाबाच्या तार चोरी होत असून, अशा प्रकारे चोरी करणारी टोळीच सक्रिय असावी असा संशय शेतकऱ्यांना असून, पोलिस प्रशासनाने अशा चोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

Theft of electricity
Jalgaon Crime News : तब्बल 20 दिवस उलटूनही मुख्य मारेकरी सापडेनात; खुनाचा तपास थंड बस्त्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.