Jalgaon News : येथील जय गणेश फाउंडेशनतर्फे द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीनदिवसीय फिरती व्याख्यानमाला शनिवार (ता. २७)पासून सुरू होत आहे. यंदा सांस्कृतिक उपक्रमाचे दहावे वर्षे असून, पहिले पुष्प हिंगोली येथील कवी गणेश आघाव गुंफणार आहेत. एक दिवसाआड होणाऱ्या तीनदिवसीय व्याख्यानमालेत द्वितीय पुष्प सोमवारी (ता. २९) व तृतीय पुष्प बुधवारी (ता. ३१) वेगवेगळ्या शाळांमध्ये गुंफले जाणार आहे. (Three day Dwarka lecture series from today at Bhusawal )
शनिवारी सकाळी साडेनऊला कुऱ्हे पानाचे येथील रा. धाे. माध्यमिक विद्यालयात सावळी खुर्द (जि. हिंगाेली) येथील कवी गणेश आघाव प्रथम पुष्प गुंफतील. ‘चला कवितेतून पेरूया जाणिवांचे बीज’ हा त्यांचा विषय आहे. द्वितीय पुष्प सोमवारी सकाळी अकराला भुसावळातील रामदास गणपत झांबरे विद्यालयात जळगाव येथील साहित्यिक डाॅ. मिलिंद बागूल गुंफतील. ‘शालेय शिक्षण, जीवन आणि मैत्रीभाव’ हा त्यांचा विषय आहे.
तृतीय पुष्प बुधवारी दुपारी साडेबाराला अहिल्यादेवी कन्याविद्यालयात अमळनेरचे साहित्यिक रमेश पवार गुंफणार आहेत. ‘लेकरांनाे, बापाला मिठून मारून घ्या रे’ हा त्यांचा विषय आहे. जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमाला आयाेजन समितीची बैठक सुरभीनगरातील कार्यालयात झाली. तीत ही माहिती देण्यात आली. समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते. फाउंडेशनचे मार्गदर्शक (कै.) अरुण मांडाळकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. (latest marathi news)
वक्त्यांचा परिचय
गणेश आघाव यांच्या ‘पोरी शाळेत निघाल्या’ या कवितेचा १६ भाषांत अनुवाद प्रकाशित झाला आहे. बालभारती किशोर मासिकात कविता प्रकाशित आहे. ‘कणसांच्या कविता’, ‘मातीला फुटले हात’, ‘आघाववाडीची गाणी’, ‘बारभाई’ हे काव्यसंग्रह प्रकाशित असून, बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुण्याच्या पूरक वाचन समितीचे सदस्य आहेत.
डाॅ. मिलिंद बागूल असाेदा (ता. जळगाव) येथील सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सत्यशाेधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत. ‘संदर्भ माझ्या जातीचे’, ‘तेवढेच संदर्भ आमचे’ ‘कथाशील’, ‘हमालपुरा ते कुलगुरू’, अशी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. कर्नाटक विद्यापीठात त्यांचे साहित्य अभ्यासले जातेय.
अमळनेरचे रमेश पवार निवृत्त पाेस्टमास्तर असून, कवी, कथा, ललित लेखनात त्यांचा हातखंडा आहे. ‘एक माळरान’, ‘गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ’ हे काव्यसंग्रह, ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं’ या बालनाट्याचे लेखन त्यांनी केले आहे. जळगाव आकाशवाणी केंद्रावरील विविध कार्यक्रमांत ते सहभागी झाले असून, विविध दिवाळी अंकात त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.