जळगाव : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)द्वारा राज्यातील पहिला एमटीडीसी ॲक्वाफेस्ट-२०२४ मेहरुण तलावात बुधवार (ता. २)पासून सुरू होत आहे. सकाळी दहाला राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन महोत्सवाचे उद्घाटन करतील. जळगावकरांना तीन दिवस जलक्रीडा महोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. (thrill of Aquafest water tourism in city from today)
महोत्सवात एमटीडीसीच्या जलक्रीडा पर्यटनातील अनुभव आणि क्षमतेचे प्रदर्शन केले जाणार आहे. महोत्सवाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नसून, जल पर्यटनाची जागरूकता निर्माण करणे, तरुणांमध्ये साहसी क्रीडांविषयी आवड निर्माण करणे आणि जलसंपत्तीचे संवर्धन व जलसुरक्षेचे महत्त्व पटवून देणे आहे.
महोत्सवाचे मुख्य आकर्षण
-बोट सफारी : शांत आणि सुरेख बोट राईडचा अनुभव
-सुपर फास्ट जेट स्की राईड्स : जलक्रीडांचा रोमांचक अनुभव
-सेलिंग बोट : शांत आणि रोमांचक अनुभवासाठी हवेच्या तालावर सेलिंग बोटवर सफर
-कयाकिंग : तलावात सुरक्षित आणि आनंददायी कयाक राईड
-फ्लाइंग फिश राईड : साहसी प्रवाशांसाठी अनोखी राईड
-बनाना राईड : कुटुंबीयांसाठी आणि गटांसाठी खास आकर्षण
-बंपर राईड : उत्साहपूर्ण आणि थरारक अनुभव
-वॉटर झोबिंग : मोठ्या पारदर्शक बॉलमध्ये पाण्यावर चालण्याचा अनुभव
-इलेक्ट्रिक शिकारा : शांततापूर्ण आणि पर्यावरणस्नेही बोट राईड
-स्कूबा डायविंग : एमटीडीसी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पाण्याखालील जगाचा अनुभव
कटू आठवणींना उजाळा
साधारण ४० वर्षांपूर्वी मेहरुण तलावात वरणगाव येथील शाळेची सहल बुडाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर आजतगायत मेहरुण तलावात बोटींग पूर्णपणे बंद होते. या अपघातात जलसमाधी मिळालेल्यांच्या नावे मेहरुण तलावाच्या गणेश घाटावर एक स्मृतिस्तंभही उभारला होता. काही वर्षांपूर्वी तसा प्रयत्न स्थानिक प्रशासनाने केला होता. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
"आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निगराणीत सुरक्षतेसाठी २० पट्टीचे पोहणारे नियुक्त केले आहेत. सेाबत वॉकीटॉकी यंत्रणा असेल. अप्रिय घटना घडल्यास तत्काळ मदत पोहोचवण्याची पूर्ण तयारी केली आहे."- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.