Jalgaon News : बुद्धपौर्णिमेच्या रात्री सातपुड्यात वन्यजीवांचा थरार; यावल वन विभागात 43 मचाणांवरून गणना

Jalgaon : यावल प्रादेशिक वन विभागातर्फे यंदाही बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली.
Eco-friendly while counting wildlife from scaffolding in forest areas. and leopard
Eco-friendly while counting wildlife from scaffolding in forest areas. and leopardesakal
Updated on

Jalgaon News : यावल प्रादेशिक वन विभागातर्फे यंदाही बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. वन्यप्राणी प्रगणनेसाठी यावल प्रादेशिक वन विभागातील चोपडा वनक्षेत्रपासून ते रावेर वनक्षेत्रमधील ठिकठिकाणी जंगल भागात मचाण तयार करण्यात आल्या. यावल प्रादेशिक वन विभागातील चोपडा वनक्षेत्रात ३, वैजापूर वनक्षेत्रात ७ मचाण, अडावद वनक्षेत्रात ४, देवझिरी वनक्षेत्रात ४, यावल पूर्व वनक्षेत्रात ७, यावल पश्चिम वनक्षेत्रात ६ तर रावेर वनक्षेत्रात १२ मचाण असे एकूण ४३ मचाण यावल वन विभागात तयार करण्यात आल्या होत्या. ( Thrill of wildlife in Satpura on night of Buddha Purnima in yawal )

मोर, रानडुक्कर, नीलगाय
मोर, रानडुक्कर, नीलगायesakal

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून यावल प्रादेशिक वन विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली. यावल प्रादेशिक वन विभागातील चोपडा वनक्षेत्रात प्राणी प्रगणना करीत असताना प्रामुख्याने कोल्हे २, ससा ४, भेकर ३, नीलगाय-६, रानडुक्कर, तडस २, मोर ३, रानमांजर २, चिंकारा २ असे एकूण २७ वन्यप्राण्यांची नोंद झाली.

वैजापूर वनक्षेत्रात अस्वल २, सांबर ३, तडस ३, कोल्हा १, चितळ ३, भेडकी २, चौशिंगा ४, सायाळ २, नीलगाय ६, रानडुक्कर २, घुबड ७, वटवाघूळ ७, वानर ११, तरस ६, असे एकूण ५८ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. बिबट वन्यप्राण्यांची डरकाळी व सकाळी प्राणीगणना करून परतत असताना बिबट वन्यप्राण्याचे पगमार्ग दिसून आले.

अडावद वनक्षेत्रात ससा ३, वटवाघूळ ४, रानडुक्कर २, अस्वल १, हरीण ३, कोल्हा १, अजगर २, पान दिवड (साप) ३, वानर २, तरस १, अस एकूण २२ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. देवझिरी वनक्षेत्रात कोल्हे ३, ससा ४, नीलगाय-३, रानडुक्कर २, तडस ३, मोर १, रानमांजर २, चिंकारा १, अजगर २, वानर, ४, तरस २, नीलगाय ५, चिंकारा २, अशा एकूण ३४ वन्यप्राण्यांची नोंद झाली. (latest marathi news)

Eco-friendly while counting wildlife from scaffolding in forest areas. and leopard
Jalgaon News : हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा भरपूर पाऊस! खानदेशातील शेतकरी अजूनही नक्षत्रांच्या भरवशावरच

यावल पूर्व वनक्षेत्रात अस्वल ३, वानर ६. लांडगा ४, चिंकारा ६, ससा ६, मोर ५, रानमांजर ४, कोल्हा ३, तरस २, रानडुक्कर ७, काळवीट ४, भेकर २, नीलगाय ६, घुबड ८, अजगर ४, वटवाघुळ ९ असे एकूण ७८ वन्यप्राण्यांची नोंद झाली.

यावल पश्चिम वनक्षेत्रात चितळ ३, भेडकी २, चौशिंगा २, सायाळ २, नीलगाय ४, रानडुक्कर २, घुबड ८, वटवाघुळ ९, वानर ४, तरस ५, अजगर ७, रानमांजर ४, अस्वल ३, मोर ४, घोरपड ५ असे एकूण ६४ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली.

रावेर वनक्षेत्रात वाघ १, बिबट ४, अस्वल १, वानर ७१, लांडगा १२, चिंकारा २६, ससा १७, मोर २३, रानमांजर ७, कोल्हा ९, तरस २, रानडुक्कर ४७, काळवीट २२, चौशिंगा १८, भेकर १९, नीलगाय १२ व घुबळ १० असे ३०१ वन्यप्राण्यांची नोंद झाली. यावल प्रादेशिक वनविभागात एकूण ५८४ वन्यप्राणी व पक्षी यांची नोंद करून निसर्गप्रेमींचा प्रतिसाद मिळाला. वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, वन्यजीव अभ्यासक अमन गुजर यांनी विशेष सहकार्य केले.

Eco-friendly while counting wildlife from scaffolding in forest areas. and leopard
Jalgaon News : फैजपूरच्या दिव्यांग दांपत्याची हंडाभर पाण्यासाठी भटकंती! विठ्ठल मंदिर भागातील समस्येकडे पालिकेचे दुर्लक्ष

वाघ, बिबटे, मोर, अन् बरेच काही..

यावल प्रादेशिक वन विभागातील रावेर वनक्षेत्रात पट्टेदार वाघ व बिबट्यांचे दर्शन देखील निसर्गप्रेमी व पर्यावरण प्रेमी यांना घडले. पाल जंगल सफारीच्या मार्गावर वाघोबाच्या पाऊलखुणा आढळल्या. याचबरोबर ट्रॅप कॅमेरामध्येही नुकतेच वाघाचे दर्शन झाले. यावल प्रादेशिक वनविभागातील जंगल हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

जंगल सफारी पर्यटकांमध्ये वाघाचे नेहमी आकर्षक आहे. उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मागदर्शनाखाली वनपरिक्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांनी सहकार्य केले.

''मागील वर्षी प्राणी गणना फक्त रावेर वनक्षेत्रामध्ये निवडक ठिकाणी करण्यात आली होती. यंदा यावल वन विभागात वन्यप्राणी गणना केल्यामुळे निश्चितच आकडे समाधानकारक आहेत. सातपुड्यामध्ये वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. हा भाग चांगला, सुरक्षित करण्यासाठी वन विभाग आवश्यक पावले उचलत आहे. सातपुडा सफारी हे त्यापैकीच एक पाऊल आहे.''- जमीर शेख, उपवनसंरक्षक वनविभाग, यावल

Eco-friendly while counting wildlife from scaffolding in forest areas. and leopard
Jalgaon News : जखमी गिधाडासाठी वन विभागासह वन्यजीवप्रेमींचे रेस्क्यू ऑपरेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.