Jalgaon Lok Sabha Constituency : मताधिक्याच्या निकषावर ठरणार विधानसभेची ‘वारी’; आजी-माजी-भावी आमदारांची कसोटी

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न असला तरी दुसरीकडे या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चाचपणीही सुरु आहे.
Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal
Updated on

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न असला तरी दुसरीकडे या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चाचपणीही सुरु आहे. त्यामुळे उमेदवार ज्या पक्षाचे त्या पक्षासह मित्रपक्षांमधील आजी-माजी व भावी आमदारांची मताधिक्य देण्यात कसोटी लागणार आहे. किंबहुना, त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून दिलेल्या मताधिक्यावरच त्यांची विधानसभेची ‘वारी’ (उमेदवारी) ठरणार आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

गेल्या काही वर्षांत राजकीय क्षेत्राला करिअर मानून काम करणाऱ्यांची महत्त्वाकांक्षा कमालीची वाढली आहे. गेल्या दशकातील एकूणच बदललेल्या राजकीय स्थितीमुळे सामान्य कार्यकर्त्यालाही मोठी स्वप्न पडू लागली आहेत. त्यामुळे राजकारणात आधीपासूनच प्रस्थापित दिग्गजांसह विधानसभा व पुढे जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची वाढत जाणारी गर्दी हे त्याचेच द्योतक आहे.

लोकसभेच्या निमित्ताने...

महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीत प्रत्येक राजकीय पक्षातील महत्त्वाकांक्षी कार्यकर्ते वेगवेगळ्या निवडणुकीसाठी उमेदवारीच्या रांगेत उभे आहेत. सध्या चैत्र- वैशाखातील कडाक्याच्या उन्हासह लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीने वातावरण तापू लागले आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीसाठी आतापासूनच चाचपणी सुरु झाली आहे.

मताधिक्य देण्यासाठी कसोटी

सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांनी विधानसभेची चाचपणी सुरु केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील स्थिती पाहता जळगाव शहरात भाजपचे आमदार राजूमामा भोळे, ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारीवरुन आदळआपट.. महायुतीत मिठाचा खडा!

एरंडोलला शिंदे गटाचे चिमणराव पाटील तर अमळनेरला मंत्री अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे तर चाळीसगावात मंगेश चव्हाण भाजपचे आमदार आहेत. म्हणजे, या सर्व सहा मतदारसंघात महायुतीचे आमदार असून त्या प्रत्येकाला भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य देणे क्रमप्राप्त ठरते. यापैकी एकाही मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही तर येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांच्या उमेदवारीत अडचणीचे ठरु शकेल.

रावेर मतदारसंघात संमिश्र

रावेर लोकसभा मतदारसंघात संमिश्र स्थिती आहे. भुसावळ व जामनेर वगळता अन्य चार मतदारसंघात भाजपचे आमदार नाहीत. भुसावळला संजय सावकारे, जामनेरला मंत्री गिरीश महाजन यांना रक्षा खडसेंना मताधिक्य द्यावे लागेल. रावेर मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी असून त्यांनीच राष्ट्रवादी शरद पवार गटाला संबंधित उमेदवाराची शिफारस केली असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे.

चोपड्यात महायुतीचे घटक म्हणून शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे व त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना रक्षा खडसेंना मताधिक्य देण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील हे खडसे कुटुंबाचे कट्टर विरोधक असले व नाराज असले तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घेऊन ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केला आहे.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

त्याचा रिझल्ट पाटलांना दाखवावा लागेल. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनाही मुक्ताईनगरातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याची परीक्षा द्यावी लागणार आहे.

एकूणच या दोन्ही मतदारसंघातून आमदार, माजी आमदार व भावी आमदार अशा सर्वांनाच आपापल्या क्षेत्रातून स्वपक्षीय अथवा मित्रपक्षीय उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी कसोटीस उतरावे लागेल. या लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारच्या सर्व कसोट्यांमधून भावी आमदारांना जावे लागणार असून मताधिक्यावर त्यांची विधानसभेची ‘वारी’ ठरणार आहे.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Election : ‘होम वोटिंग’द्वारे पहिल्या दिवशी 52 जणांचे मतदान; 2 दिवस चालणार प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()