Jalgaon Municipality News : जळगाव मनपाच्या आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली

Jalgaon Municipality : एकाच ठिकाणी तीन वर्षे व जिल्ह्यात चार वर्षे असा निकष पूर्ण केल्याने महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे.
Commissioner Vidya Gaikwad
Commissioner Vidya Gaikwadesakal
Updated on

Jalgaon Municipality News : एकाच ठिकाणी तीन वर्षे व जिल्ह्यात चार वर्षे असा निकष पूर्ण केल्याने महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली नसून जळगाव आयुक्तपदीही नव्याने कुणाची नियुक्ती झालेली नाही. श्रीमती गायकवाड या जळगाव मनपात फेब्रुवारी २०२१ मध्ये सहायक आयुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या, नंतर मे २०२२ मध्ये त्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. (Transfer of Jalgaon Municipal Commissioner)

जळगावला येण्याआधी त्या अमळनेर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून वर्षभराहून अधिक काळ कार्यरत होत्या.

त्यामुळे जिल्ह्यात चार वर्षांपेक्षा जास्त तसेच जळगाव मनपात तीन वर्षांहून अधिक काळ झाल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली झाली आहे. मंगळवारी रात्री हे आदेश प्राप्त झाले. त्यांनी तातडीने पदभार सोडण्याचे आदेशात नमूद आहे. (latest marathi news)

Commissioner Vidya Gaikwad
Jalgaon News : अमळनेर तालुक्यात 17 BSNL 4G चे टॉवर! जलद नेटवर्क मिळण्याची अपेक्षा

कार्यकाळाचा निकष लपवला

श्रीमती गायकवाड यांना जिल्ह्यात चार वर्षे व जळगाव मनपात तीन वर्षाहून अधिक काळ झाल्याबाबत आपण फेब्रुवारीत निवडणूक आयोगासह शासनाला मेल केला होता.

पण, गायकवाड यांनी ही बाब लपविली, त्यासंदर्भातही आपण पाठपुरावा केला. अखेर आज त्यास यश आले व त्यांची बदली झाली, अशी माहिती ॲड. शुचिता हाडा यांनी दिली.

Commissioner Vidya Gaikwad
Jalgaon Lok Sabha Election : जळगावसाठी ठाकरे गटाच्या उमेदवारीबाबत आज चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.