Gold-Silver Rate : सोन्याच्या भावात अडीच हजार, चांदीत तीन हजारांची घसरण! अर्थसंकल्पात सीमाशुल्क कमी केल्याचा परिणाम

Jalgaon News : केंद्रीय वित्त व नियोजनमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सहा टक्के सीमाशुल्क (कस्टम ड्यूटी) कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात लागलीच घसरण झाल्याचे दिसून आले.
Gold Silver Rate
Gold Silver Rateesakal
Updated on

Jalgaon News : केंद्रीय वित्त व नियोजनमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सहा टक्के सीमाशुल्क (कस्टम ड्यूटी) कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात लागलीच घसरण झाल्याचे दिसून आले. देशात प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅमसाठी २ हजार ५०० रुपयांनी कमी झाले असून, चांदीच्या भावात प्रतिकिला तीन हजारांची घसरण झाली आहे. (Two and a half thousand in price of gold three thousand in silver)

यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने खरेदीदारांना संधी मिळाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (ता. २३) अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थसंकल्पात सोने खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे. सोने-चांदीवर आधी १० टक्के सीमाशुल्क आकारले जात होते, तर प्लॅटिनमवर यापूर्वी १५ टक्के आयात शुल्क (इम्पोर्ट ड्यूटी) होते.

अर्थसंकल्प जाहीर करताना सोन्या-चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली. ही घोषणा झाल्यानंतर लागलीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले. यामुळे जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव २५०० रुपयांनी कमी झाले आहेत. (latest marathi news)

Gold Silver Rate
Jalgaon Road Damage : निकृष्ट कामामुळेच 70 कोटींचा महामार्ग खड्ड्यात! वारंवार दुरुस्तीनंतरही ‘जैसे थे’

जळगावच्या सराफ बाजारात २२ जुलैस सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅमला ७३ हजार २०० रुपये होते. मंळगवारी हेच भाव ७० हजार ५०० रुपये खाली आले आहेत. चांदीचा २२ जुलैस प्रतिकिलो भाव ९० हजार होता. तो मंगळवारी तीन हजारांनी कमी होऊन ८७ हजारांपर्यंत आला आहे.

"केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी केल्याचे जाहीर केले. त्यामुळेच बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या भावात घसरण दिसून येत आहे. सरकारचा हा चांगला निर्णय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळू शकेल." - सुशील बाफना, संचालक, आर. सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव

Gold Silver Rate
Jalgaon Rain Damage Crop : ‘ती’ 69 गावे भरपाईच्या प्रतीक्षेत! पारोळा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची प्रशासनाला आर्त हाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.