Jalgaon Crime News : अवैध वृक्षतोडीसह दोघे ताब्यात; वन विभागाची हिंगोण्यात कारवाई

Jalgaon Crime : कठोरा ते हिंगोणा रस्त्यावर ट्रॅक्टर व्दारे अवैधरित्या वृक्षांची कत्तल करून लाकड नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळत वनविभागाने मुद्देमाल जप्त केला.
Illegal tree felling tractors, two suspects along with forest department personnel on Dongar kathora to Hingna road
Illegal tree felling tractors, two suspects along with forest department personnel on Dongar kathora to Hingna roadesakal
Updated on

Jalgaon Crime News : यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रातील डोंगर कठोरा ते हिंगोणा रस्त्यावर ट्रॅक्टर व्दारे अवैधरित्या वृक्षांची कत्तल करून लाकड नेणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळत वनविभागाने मुद्देमाल जप्त केला.

वनविभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा ते हिंगोणा रस्त्या दरम्यान शनिवारी (ता.८) रात्री यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. (Jalgaon Two detained with illegal logging Action of Forest Department in Hingone)

Illegal tree felling tractors, two suspects along with forest department personnel on Dongar kathora to Hingna road
Crime News: आंबे चोरण्याचा संशयातून महिलेवर गोळी झाडत केला हल्ला

वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे त्यांच्या सहकारी पथकाने स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (एम एच २९ एम ४९८४) यातून अवैधरित्या निंब, करंज.

सुबाभुळ जातीचे सुमारे १ लाख ७५ हजार रूपये किमतीचे ६.३०० घन मिटर लाकुड वाहतुक करणारे ट्रॅक्टर चालकासह दोन जणांना ताब्यात घेतले.

मुद्देमालासह ट्रॅक्टर यावल वन आगारात जमा करण्यात आला. आगार रक्षकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंगर कठोरा वनपरिमंडल अधिकारी रवींद्र तायडे तपास करीत आहे.

Illegal tree felling tractors, two suspects along with forest department personnel on Dongar kathora to Hingna road
Nagpur Crime: कारागृहातून सुटले, घरफोडी करायला लागले...दोघांना अटक ; सहा गुन्ह्यांचा उलगडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.