Jalgaon Heavy Rain : अग्नावती नदीत दोघांचा मृत्यू; नगरदेवळ्यात पूर; काहींच्या टपऱ्या गेल्या वाहून

Latest Jalgaon News : ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह वर काढून पंचनामा केला व विच्छेदनासाठी पाचोऱ्याला मृतदेह पाठविले. त्या दोघांच्या मृत्यूने नगरदेवळ्यावर शोककळा पसरली.
Agnavati river floods.
Agnavati river floods.esakal
Updated on

नगरदेवळा (ता. पाचोरा) : मराठवाड्यातील काळदरी परिसरात रविवारी (ता. १३) रात्री दमदार पाऊस झाल्याने अग्नावतीला सोमवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास अचानक पूर आला. पुलावरून जात असलेले राजेंद्र गोरख पाटील (वय ४०) व निवृत्त सैनिक रवींद्र प्रभाकर पाटील (४५) पाण्यात वाहून गेले. अंधार असूनही एक व्यक्ती त्या दोघांना वाचविण्यासाठी सरसावली.

त्यालाही स्वत:चा जीव वाचविणे कठीण झाल्याने त्याने त्यांची साथ सोडली. नदीचा पूर दुपारी बारादरम्यान काहीसा ओसरला. महादेव मंदिरासमोरील पुलाच्या खाली दोघांनी एकमेकांची बोटे घट्ट पकडलेल्या अवस्थेत सापडले. ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह वर काढून पंचनामा केला व विच्छेदनासाठी पाचोऱ्याला मृतदेह पाठविले. त्या दोघांच्या मृत्यूने नगरदेवळ्यावर शोककळा पसरली. (Two killed in Agnavati river)

Agnavati river floods.
Jalgaon Heavy Rain : जिल्ह्यात परतीच्या पावसाने 4 हजार हेक्टरवर नुकसान! कापूस सर्वाधिक प्रभावित; शेतकरी हवालदील

आठ दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने अग्नावती चौपाटीवरील व्यावसायिक निद्रेत असताना, अचानक आलेल्या पुरामुळे अनेकांच्या टपऱ्या, एकाच्या कोंबड्या वाहून गेल्या. ग्रामपंचायत व सिंचन विभागाने सतर्क राहण्याची सूचना दिली होती. अग्नावती चौपाटीवर दर सोमवारी आठवडेबाजार भरतो. मात्र, पुरामुळे बाजार भरू शकला नाही.

नगरदेवळ्यात खालचे व वरचे गाव असे दोन भाग आहेत. दोघांमधून अग्नावती वाहते. दोन्ही गावांना जोडणारा छोटा पूल ४० वर्षांपूर्वीचा आहे. त्याची अवस्था बिकट झाली आहे. पुलावर पाणी वाढले, की दोन्ही गावांचा व इतरत्र जाण्याचा संपर्क तुटतो. पर्यायाने नागरिकांचे हाल होतात. यामुळे पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पूल उंच असता, तर आज दोघांचा मृत्यू झाला नसता, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.

Agnavati river floods.
Nashik Heavy Rain: निफाडच्या उत्तरपट्यात पावसाचा रुद्रावतार! उगावला 30 कुटुंबाच्या घरात पाणी, शिवडीला 2 हजार कोंबड्यांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.