अमळनेर : गुजरातमधील पूरपरिस्थितीमुळे सुरतकडे जाणाऱ्या एका प्रवासी गाडीला येथील रेल्वेस्थानकावर बुधवारी (ता.२८) तब्बल साडेपाच तास थांबावे लागले. म्हणून लांबचा प्रवास करणाऱ्या गाडीमधील प्रवशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अमळेनर रोटरी क्लब व लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दोन हजार प्रवाशांची ऐनेळी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे प्रवशांसह जनतेमधूनही या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. (Two thousand passengers hunger thirst satisfied)