जळगाव : दुचाकी, चारचाकीसह सोन्यालाही झळाळी

फटाक्यांच्या आतषबाजीत सोनपावलांनी आली लक्ष्मी
Gold prices fall today
Gold prices fall todaysakal
Updated on

जळगाव : धनत्रयोदशीला ग्राहकांनी सोन्यासह विविध वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. नंतर लक्ष्मीपूजनालही दुचाकी, चारचाकी बुकिंगसह सोने खरेदीला झळाळी मिळाली. सूर्यास्ताच्या मुहूर्तावर सोनपावलांनी आलेल्या लक्ष्मीचे भक्तांनी विधीवत पूजन आणि फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.

कोरोनाच्या सावटाखाली गेल्या वर्षी दिवाळीचा सण मर्यादित स्वरूपात साजरा झाला. लॉकडाउन व त्यामुळे आलेल्या आर्थिक मंदीचाही त्यावर प्रभाव होता. यंदा मात्र कोरोनाची दुसरी लाट जूनपासूनच ओसरू लागल्यानंतर दिवाळीपर्यंत जनजीवन व अर्थव्यवस्थाही पूर्वपदावर आली होती. त्यामुळे यंदाची दिवाळी चांगली साजरी होणार, अशी अपेक्षा होती. महागाईमुळे त्यावर परिणाम झाला असला, तरी दिवाळी बाजारपेठेच्या दृष्टीने दणक्यातच साजरी होतेय.

Gold prices fall today
दुबई : भारताचा आजही मोठ्या विजयासाठी प्रयत्न

सोन्यात विक्रमी उलाढाल

धनत्रयोदशीला जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याची विक्रमी विक्री झाली. त्या एकाच दिवसात १५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगितले जाते. गुरुवारी (ता. ४) लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही ग्राहकांनी सुवर्ण खरेदीवर भर दिला. लक्ष्मीपूजन व शुक्रवारच्या पाडव्यालाही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे.

दुचाकी, चारचाकीचे बुकिंग

मोबाईल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, अन्य घरगुती उपकरणांसह दुचाकी व चारचाकीच्या मार्केटलाही दिवाळी व लक्ष्मी पावल्याची चिन्हे आहेत. दसऱ्याच्या दिवशी हजार दुचाकी व चारशेवर चारचाकीच्या विक्रीनंतर दिवाळीच्या या दोन-तीन मुहूर्तांवर हजारांवर वाहनांचे बुकिंग झाल्याचे सांगितले जात आहे. ह्युंडाई, मारुती, नेक्सा, किया, रेनॉ, होंडा, फोर्ड, टोयोटा, महिंद्रा या ब्रॅन्डेड कारसह होंडा ॲक्टीवा, शाइन, हिरोच्या मोटरसायकल, मोपेड, टीव्हीएस, बजाज व अन्य प्रकारच्या दुचाकींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. पाडव्यासाठीही शेकडो वाहनांची नोंदणी झाली असून, चारचाकीच्या काही मॉडेल्ससाठी महिना, दोन महिन्याची वेटिंग सुरू असल्याचे डिलर्सने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Gold prices fall today
Corona Update : राज्यात 1141 नवे रुग्ण तर 32 रुग्णांचा मृत्यू

सायंकाळपर्यंत गर्दी

दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शोरूमवर सायंकाळी सहापर्यंत गर्दी होती. घरगुती उपकरणे, मोबाईल व सोने-चांदीच्या दुकानांवर रात्रीपर्यंत गर्दी होती. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरही अनेकांनी वस्तू खरेदीचा योग जुळवून आणला. बाजारातही सायंकाळपर्यंत गर्दी होती. नंतर मात्र नागरिकांनी आपल्या घरीच, रांगोळ्यांनी सजविलेल्या अंगणात, आकाशकंदील, रोषणाईच्या झगमगाटात, फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीचे स्वागत केले.

फटाक्यांचे शॉर्टेज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा फटाके उत्पादनावर परिणाम झाला होता. कोरोनाची लाट राहील का, राहिली तर फटाक्यांवर बंदी असेल का, या भीतीने व संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उत्पादकांनी जवळपास ४० टक्के उत्पादन कमी केले. त्यामुळे यंदा अनेकांना फटाके मिळालेच नाहीत. ज्यांनी आठवडाभरापूर्वी फटाके विकत घेतले, ते नफ्यात राहिले. तर काहींना काल आणि आज जादा भाव देऊनही फटाके मिळत नव्हते. शहरातील काही होलसेल व्यापाऱ्यांनी फटाके संपल्याचे फलक लावून ठेवल्याचेही दिसून आले. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()