molested
molestedesakal

Jalgaon News : मामाने केला भाचीचा विनयभंग; चाळीसगाव तालुक्यातील घटना

Jalgaon : सॅन्डल घेण्याच्या बहाण्याने सख्या मामाने आपल्या नऊ वर्षीय भाचीला शेतात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली.
Published on

Jalgaon News : सॅन्डल घेण्याच्या बहाण्याने सख्या मामाने आपल्या नऊ वर्षीय भाचीला शेतात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. चिमुकलीने मामाच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला व जवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना हा प्रकार सांगितला. परिसरातील ग्रामस्थांनी नराधम मामाला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात मामाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मामाला अटक करण्यात आली आहे. (Uncle molested niece Incidents in Chalisgaon )

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील नऊ वर्षीय बालिका आपल्या आई- वडिलांसमवेत राहते. रविवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास या बालिकेचा मामा समाधान उर्फ सोमा अभिमान भिल हा घरी आलेला होता. बाजारातून सॅन्डल घेऊन देतो, असे सांगून तो भाचीला घेऊन गेला. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी परत आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला असता, परिसरातील एका शेतात काम करणाऱ्यांनी समाधानला पकडून ठेवल्याचे व पीडित बालिका रडत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, बालिकेच्या कुटुंबीयांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत खरा प्रकार लक्षात आला.

molested
Jalgaon Accident News : दुचाकींची समोरासमोर धडक; एक जागीच ठार, दुसरा जखमी

आपल्याला मामा समाधान याने नवीन सॅन्डल घेऊन देण्याच्या बहाण्याने लिंबूच्या बागेत नेऊन विनयभंग केल्याचे तिने सांगितले. मात्र, बालिकेने तेथून पळ काढून जवळच शेतात काम करणाऱ्या महिलांना मामा त्रास देत असल्याचे सांगितल्याने खरा प्रकार उघडकीस आला. संतप्त महिला व ग्रामस्थांनी समाधान भिल याला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचले व नराधम मामाला त्यांनी ताब्यात घेतले.

मारहाणीत जखमी झालेल्या समाधानला उपचारार्थ धुळे येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात ‘पोस्को’ कायद्यासह इतर विविध कलमान्वये संशयित समाधान भिलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

molested
Jalgaon News: राष्ट्रीय महामार्गावर एक तास वाहतुकीची कोंडी! पारोळा येथे वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय झाल्याने तीव्र नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.