Jalgaon News : ‘हॉर्टिकल्चर क्लस्टर’ प्रायोगिक टप्प्यात जिल्ह्याचा समावेश करा; केंद्रीय राज्यमंत्री खडसे

Jalgaon : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले.
Union Minister Raksha Khadse while presenting various demands to Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan, including the benefit of fruit crop insurance.
Union Minister Raksha Khadse while presenting various demands to Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan, including the benefit of fruit crop insurance.esakal
Updated on

Jalgaon News : प्रलंबित फळपीक विम्याचा लाभ मिळावा, तसेच फळपीक विम्याचा लाभ मिळावा, या मागणीबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले. पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहार २०२२ मध्ये विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत भरपाई मिळालेली नाही. (Include district in pilot phase of Horticulture Cluster )

या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी रक्षा खडसे यांच्या मागणीनुसार तसेच तत्कालीन कृषिमंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीकडे पीकविम्याचा लाभ नाकारलेल्या ११ हजार २२ शेतकऱ्यांपैकी आठ हजार १९० शेतकऱ्यांनी दाद मागितली असता, समितीने पडताळणी करून लाभासाठी पात्र ठरविलेल्या सहा हजार ६८६ शेतकऱ्यांना पीकविम्याचा प्रलंबित लाभ मिळण्याबाबत मंगळवारी (ता. २५) केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेट घेतली. (latest marathi news)

Union Minister Raksha Khadse while presenting various demands to Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan, including the benefit of fruit crop insurance.
Jalgaon News: आधुनिक सावित्रीने दिले पतीला जीवदान! अमळनेेरच्या गिरीश पाटील यांच्यावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेत असून, केळीसाठी आवश्यक सुपीक जमीन एकूण जवळजवळ एक लाख हेक्टर येथे उपलब्ध असून, जिल्ह्यातील केळीची अनेक देशांत मागणी असल्याने जळगाव जिल्ह्याचा ‘फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम’ (हॉर्टिकल्चर क्लस्टर)च्या प्रायोगिक टप्प्यात समावेश होण्याबाबत मंत्री रक्षा खडसे यांनी कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याकडे मागणी केली.

Union Minister Raksha Khadse while presenting various demands to Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan, including the benefit of fruit crop insurance.
Jalgaon News : राज्यात स्वच्छ, सुंदर बसस्थानकात चोपडा अव्वल; 50 लाखांचे पहिले बक्षीस जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.