Bhusawal-Pune Train : भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वेसाठी सकारात्मक : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

Bhusawal-Pune Train : आषाढी एकादशीनिमित्त अनारक्षित मोफत ‘विशेष आषाढी रेल्वे’ साठी मंगळवारी (ता. २) केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.
Union Minister of State Raksha Khadse met and discussed with Railway Minister Ashwini Vaishnav to start Bhusawal-Pune-Bhusawal Railway.
Union Minister of State Raksha Khadse met and discussed with Railway Minister Ashwini Vaishnav to start Bhusawal-Pune-Bhusawal Railway.esakal
Updated on

Bhusawal Pune Train : भुसावळ- पुणे - भुसावळ नवीन रेल्वे सुरू करणे, रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणाऱ्या रेल्वेस्थानकांवर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे आणि आधी सुरू असलेल्या व कोविड कालावधीत थांबा रद्द केलेल्या गाड्यांना पुन्हा थांबा देणे याबाबत, तसेच दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त अनारक्षित मोफत ‘विशेष आषाढी रेल्वे’ साठी मंगळवारी (ता. २) केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली. (Raksha Khadse statement of Positive for Bhusawal Pune Railway)

जळगाव तसेच बुलडाणा जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे येथे स्थायिक असून, कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने भुसावळ-पुणे रेल्वे सुरू करण्याबाबत प्रवाशांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार ही भुसावळ- पुणे- भुसावळ रेल्वे लवकर सुरू होणे, तसेच बोदवड स्थानक येथे नवजीवन, सुरत-अमरावती, आजाद हिंद, नांदुरा स्थानक येथे हैदराबाद - जयपूर सुपरफास्ट, प्रेरणा एक्स्प्रेस, गरीबरथ, रावेर स्थानक येथे महानगरी, निंभोरा स्थानक येथे अमृतसर एक्स्प्रेस. (latest marathi news)

Union Minister of State Raksha Khadse met and discussed with Railway Minister Ashwini Vaishnav to start Bhusawal-Pune-Bhusawal Railway.
Nashik Pune Highspeed Train: नाशिक-पुणे हायस्पीड ट्रेन शिर्डी मार्गे धावणार! 'या' कारणामुळे बदलण्यात आला मार्ग

भुसावळ स्थानक येथे राजधानी एक्स्प्रेस टेक्निकल हॉल्ट तर मलकापूर स्थानक येथे अमरावती एक्स्प्रेस, गरीबरथ आदी गाड्यांना थांबा देण्याबाबत तसेच केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्यामार्फत आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर जाणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षी प्रमाणे १६ जुलैला जाण्यासाठी व १७ जुलैला परत येण्यासाठी भुसावळ - पंढरपूर - भुसावळ अनारक्षित मोफत ‘विशेष आषाढी रेल्वे’ गाडी उपलब्ध करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली. यावर तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे रेल्वे मंत्री यांनी यावेळी आश्वासन दिले.

Union Minister of State Raksha Khadse met and discussed with Railway Minister Ashwini Vaishnav to start Bhusawal-Pune-Bhusawal Railway.
Bhusawal- Pune Express रोज रात्री सुरू करा; सल्लागार समिती बैठकीत मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.