Jalgaon News : कामे होत नसेल तर तसे सांगा, बदली करते : केंद्रीय मंत्री खडसे; ‘दिशा’ समितीची बैठकीत इशारा

Jalgaon News : आपल्या खात्यातील कामकाजाची पूर्ण माहिती न घेता अधिकारी कसे येतात, उत्तरे का देता नाही, खोटी माहिती का दिली ? असे अनेक प्रश्‍न विचारात मंत्री खडसे संताप व्यक्त केला.
Union Minister of State Raksha Khadse speaking at the meeting held in the District Planning Committee Hall on Saturday.
Union Minister of State Raksha Khadse speaking at the meeting held in the District Planning Committee Hall on Saturday.esakal
Updated on

Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रेल्वे विभाग ‘बीएसएनएल’ या केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी आज ‘दिशा’ समितीच्या बैठकीत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे न देणे, उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे मंत्री खडसे चांगल्याच संतापल्या. आपल्या खात्यातील कामकाजाची पूर्ण माहिती न घेता अधिकारी कसे येतात, उत्तरे का देता नाही, खोटी माहिती का दिली ? असे अनेक प्रश्‍न विचारात मंत्री खडसे संताप व्यक्त केला. (Union Minister raksha Khadse Warning to officers)

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार हे लोकप्रतिनिधींनी सांगूनही राष्ट्रीय महामार्गाची कामे करीत नाही, चुकीची माहिती देतात, यामुळे त्यांची तक्रार करून त्यांची बदली करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्याचा ठराव आज दिशा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

केंद्रीय मंत्री खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज ' दिशा' (जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती) बैठक नियोजन सभागृह झाली. खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक आर. एस. लोखंडे विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

पावसाळ्यात रेल्वेच्या आचेगाव दुसखेडा पुलाखाली पाणी साचते शेतकऱ्यांना यापुलाखालून जाता येत नाही. नांदूरा आरओबी’चे काम अनेक वर्षापासून अपूर्ण आहे ते का होत नाही? आदी रेल्वेच्या कामाबाबत मंत्री खडसेंनी प्रश्‍न विचारले. रेल्वेचे सात अधिकारी उपस्थित होते.

मात्र आम्ही तांत्रिक अधिकारी नाही, आम्हाला हे माहिती नाही. या मीटिंगची माहिती कालच मिळाली. तयारी करायला वेळ मिळाला नाही अशी उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे मंत्री खडसेंनी राग व्यक्त करीत तुमच्या विभागाची माहिती नसते तर बैठकीला का येतात. यापुढे माहिती घेऊन बैठकीला येत जा असा दम दिला. (latest marathi news)

Union Minister of State Raksha Khadse speaking at the meeting held in the District Planning Committee Hall on Saturday.
Pune rain Update: पुणेकरांनो काळजी घ्या! मुठा नदीला पूर... येरवड्यातील ४००-५०० नागरिकांचे स्थलांतर

बदलीचा प्रस्ताव

तरसोद -फागणे महामार्गाचे काम अपूर्ण आहे. तरसोद बायपासचेही काम अपूर्ण आहे. गेल्या डिसेंबर २०२३ मध्येच हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतांना त्यावर खड्डे पडले आहेत. डांबरीकरण तर किमान मुरूम टाकून खड्डे तर बुजवा, असे मंत्री खडसे यांनी सांगितले. त्यावर राष्ट्रीय महामार्गाचे प्रकलप संचालक पवार यांनी मी बघतो, करतो.

असे उत्तर दिले. मंत्री खडसेंनी दोन दिवसांपूर्वी चोपडा येथील महामार्गावर खड्डे बुजविण्यास सांगितले होते. त्याचे काम झाले ? असे विचारताच अधिकारी पवार यांनी ते काम झाले असे सांगितले. दरम्यान मंत्री खडसे यांनी चोपडा येथील एकास फोन करून महामार्गाचे काम झाले का ? असे विचारताच तो नाही म्हणाला.

दरम्यान आमदार सावकार, आमदार भोळे यांनीही पवार यांच्याविषयी तक्रारी केल्या. त्यावर मंत्री खडसे यांनी तुम्ही काम का करीत नाही, खुर्चीत बसून का असतात. तुमच्याकडून काम होत नसेल तर तसे सांगा, मी मंत्री गडकरी साहेबांना सांगते तुमची बदली करा.

अन काम करणारा अधिकारी द्या. बीएसएनएल, वीज कंपनी, जलशक्ती योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना आदी विभागाचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांना योग्य माहिती देता आली नाही. यामुळे पुढील बैठकीत योग्य माहिती द्या, असे मंत्री खडसेंनी सांगितले.

साडे चार किमी.साठी १४ कोटी ?

वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजने समोरील कच्चा रस्ता साडे चार किलोमीटरचा आहे. तो तयार करण्यासाठी तब्बल साडे चौदा कोटीचा निविदा मंजूर झाली आहे. हा रस्ता योजनेच्या पाण्याखाली जाणारा आहे तरी यावर एवढा खर्च कसा ? असा जाब आमदार सावकारेंनी विचारला. यावेळी या कामाची चौकशी करण्याचा ठराव झाला.

Union Minister of State Raksha Khadse speaking at the meeting held in the District Planning Committee Hall on Saturday.
Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच ठिकाणी वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.