Sakal Samwad : महान गायक किशोरदांना जन्मदिनी अनोखी ‘चित्रांजली’; जळगावातील अनिल पाटील यांच्या संग्रहातील शंभरावे चित्र

Sakal Samwad : महान गायक किशोर कुमार यांची रविवारी (चार ऑगस्ट) ९५वी जयंती. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षीच त्यांच्या चाहत्यांकडून संपूर्ण भारतभर विविध पद्धतीने आदरांजली वाहिली जाते.
singer Kishore kumar, Anil Patil
singer Kishore kumar, Anil Patilesakal
Updated on

Sakal Samwad : महान गायक किशोर कुमार यांची रविवारी (चार ऑगस्ट) ९५वी जयंती. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षीच त्यांच्या चाहत्यांकडून संपूर्ण भारतभर विविध पद्धतीने आदरांजली वाहिली जाते. जळगावचे असेच एक त्यांचे चाहते असलेले छंद कलाकार अनिल पाटील यांनी किशोरदांचे चित्र रेखाटून त्यांना अभिवादन केले. हे चित्र ते किशोरदांचे जन्मगाव असलेल्या खंडवा (मध्य प्रदेश) येथील समाधीस्थळावर नेऊन श्रद्धांजली वाहणार आहेत. विशेष म्हणजे, किशोरदांच्या विविध मूडमधील शंभर चित्रांचे त्यांच्या जन्मशताब्दीला समाधीस्थळावर चित्रप्रदर्शन भरविण्याचा संकल्पही श्री. पाटील यांनी ‘सकाळ संवाद’ मध्ये व्यक्त केला. (singer Kishore kumar is 100th picture from collection of Anil Patil )

चित्रपट अभिनेता, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार अशी बहुआयामी कलाकार म्हणून ओळख असलेल्या महान गायक किशोर कुमार यांच्या अभिनयासह त्यांनी गायिलेल्या गितांचा मोठा प्रभाव भारतीय रसिकश्रोत्यांवर कायम आहे. त्यापैकीच अनिल रामभाऊ पाटील हेदेखील त्यांचे एक चाहते आहेत. त्यांनी आतापर्यंत किशोरदा यांचे काढलेले हे पाचवे व त्यांच्या संग्रहातील शंभरावे चित्र आहे. किशोरदा यांचे हे चित्र घेऊन ते रविवारी (पाच ऑगस्ट) खंडवा येथील किशोरदांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये सांगितले.

जळगावच्या एका बँकेत अधिकारी असलेले पाटील ‘सकाळ संवाद’मध्ये म्हणाले की, पेन्सिल स्केच रेखाटणे, जुनी गाणी ऐकणे मला आवडते. जळगाव आकाशवाणीसह विविध भारतीचा वयाच्या ११व्या वर्षांपासून आजतागायत मी नियमित श्रोता व संस्कार भारतीचा कलासाधक आहे. चित्रकलेची आवड शालेय जीवनापासूनच, पण चित्रकलेविषयी कोणतेही शिक्षण घेतले नाही. वडील चित्रकला शिक्षक व मूर्तीकारही होते.

त्यांच्याकडूनच हा चित्रकलेचा वारसा मिळाला. मोठे बंधू साबण शिल्पकार असून, कुटूंबातील सदस्यही कलाकार आहेत. १९९० ते १९९६ या काळात स्थानिक वृत्तपत्रांत उपसंपादक म्हणून काम केलं आहे. नोकरीच्या कामातील व्यस्ततेमुळे बरीच वर्षे स्केचेस रेखाटण्यात खंड पडला होता. मात्र, कोरोना टाळेबंदीपासून म्हणजेच २०२०पासून पुन्हा स्केचेस रेखाटायला सुरुवात केली. चार वर्षांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी अशा औचित्याने ९९ स्केचेस रेखाटली गेलीत. त्यांचंच प्रदर्शन ऑगस्ट २०२२मध्ये भरविण्यात आलं. (latest marathi news)

singer Kishore kumar, Anil Patil
Sakal Podcast: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस कसा असेल? ते हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील नऊ व भारतातील आणखी सहा अशा एकूण १५ भारतरत्न सन्मानप्राप्त मान्यवरांच्या स्केचेसचा त्यात समावेश होता. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे एकूण सात स्केचेस रेखाटले आहेत. त्यातील काही पंडितजींसोबत असणारे पुणे येथील प्रख्यात छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या छायाचित्रांवरून रेखाटले आहेत. या सर्व स्केचेसचं कौतुक पाकणीकर यांच्यासह खुद्द पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र जयंत जोशी यांनीही केल्याचा खूपच आनंद आहे.

लता दीदींच्या चित्राला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी!

डिसेंबर २०२२मध्ये बीड येथे संस्कार भारती देवगिरी प्रांत आयोजित कलासाधक संगममध्ये भारतरत्न चित्रप्रदर्शनात मी सहभागी होतो. यावेळी उपस्थित असलेले मराठी चित्रपट अभिनेता संदीप पाठक यांचं स्केच त्यांना भेट देऊन त्यांची स्वाक्षरी मिळवली. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन यांनाही त्यांचं स्केच भेट देऊन त्यांचीही स्वाक्षरी घेण्याचा योग आला. मदुराई (तामिळनाडू) येथील 'फोर टी सक्सेस ॲकॅडमी'ने मे २०२२मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धेत गानसम्राज्ञी लता दीदी यांच्या चित्राला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळालं आहे. त्याच महिन्यात मनकर्णिका आर्ट गॅलरी झांसी (उत्तर प्रदेश) येथे आयोजित राष्ट्रस्तरीय स्पर्धेत ९२ चित्रकारांत माझ्या दोन चित्रांची निवड झाली होती.

''चित्र प्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर शिक्षकांकडून शाळांमध्ये प्रदर्शन ठेवण्याबाबत विचारणा झालीय, म्हणून उर्वरित भारतरत्न सन्मानप्राप्त व्यक्तींचेही स्केचेस रेखाटण्याचे ठरविले आहे. यानिमित्त पेन्सिल आर्टची ओळख व भारतरत्न सन्मानप्राप्त महान व्यक्तिमत्त्वांचा परिचय शालेय विद्यार्थ्यांना करून देता येईल. यासाठी प्रयत्नशील आहे. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ चित्रकलेसाठी देण्याचे ठरविले आहे. कॅनव्हासवर जलरंगातील व तैलरंगातील स्केचेस साकारणार आहे. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांत चित्र प्रदर्शन लावण्यासाठीही प्रयत्नशील आहे.''-अनिल रामभाऊ पाटील, छंद कलाकार, जळगाव.

singer Kishore kumar, Anil Patil
Sakal Podcast: ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत ते कमाईबाबत प्रश्न विचारताच तब्बू भडकली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.