Jalgaon News : राज्य सरकारच्या धोरणामुळे चार लाख शेतकऱ्यांवर अन्याय : उन्मेष पाटील

Latest Jalgaon News : जिल्ह्यातील केळी, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Unmesh Patil
Unmesh Patilesakal
Updated on

Jalgaon News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत एक रुपयात पीकविमा शेतकऱ्यांनी काढला होता; परंतु राज्य सरकारने विमा कंपनीस ४४९ कोटींपेक्षा जास्तीची रक्कम न दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अंदाजित चार लाख शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिल्याचा आरोप शिवसेना (उबाठा)चे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला. (Unmesh Patil statement Injustice to four lakh farmers)

अपंग युनिट भरतीच्या नावाखाली भाजपचे आमदार मंगेश चव्हाण निराधार आरोप करीत आहेत. जो माणूस त्यांनी पकडला त्याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारे पैसे गोळा केल्याबाबतचे गुन्हे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील केळी, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांना भावांतर योजनेचे आमिष दाखवून मते मिळविली.

प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्यांनी केवळ हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजेच २०० रुपये प्रतिक्विंटल मदत करून थट्टा केल्याचा आरोप केला. जिल्ह्यातील केळी पीकविमा ज्यामध्ये सहा हजार ६८६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवले होते असे शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनास देऊन या लोकांना नुकसानभरपाई देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते;

परंतु मंत्री व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ७० ते ८० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. (latest marathi news)

Unmesh Patil
Pakistan International Airlines: सुधरा रे ! पाकिस्तानी विमान पेशावरऐवजी उतरले कराचीत, प्रवाशांनी घातला गोंधळ

ठिबकचे अनुदान रखडले

चालू पीकविम्यापोटी राज्य सरकारने विमा कंपनीस विमा हप्त्याची रक्कम न दिल्यामुळे अजूनपर्यंत पीकविमा कंपनीमार्फत क्लेम सेटल झालेले नाहीत व ही नुकसानभरपाई मिळण्यासदेखील विलंब होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील २५ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे ठिबकचे १५५ कोटींपेक्षा जास्त रकमेचे अनुदान रखडले आहे.

याबाबत कुठलीही कार्यवाही सरकार करत नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन मंजूर झालेला असून, याबाबत जळगाव जिल्ह्यातील गावे वाढलीच नाहीत, असे उन्मेष पाटील यांनी सांगितले. आमदार चव्हाण यांनी वाहनांचे इन्शुरन्स कसे काढले याचा इतिहास माझ्याकडे आहे. त्यांनी दुधाच्या अनुदानावर बोलावे, असे आव्हानदेखील उन्मेष पाटील यांनी दिले.

"उन्मेष पाटील यांचा दिवस माझ्यावर टीका केल्याशिवाय सुरू होत नाही; परंतु त्यांनी टीका अथवा आरोप करताना अभ्यास करून बोलावे. विनाकारण हवेत आरोप करू नयेत. दूध संघ आमच्या ताब्यात आल्यापासून आम्ही उत्पादकांच्या दृष्टीने चांगले निर्णय घेतले, त्याचे सकारात्मक परिणाम दूध उत्पादकांसमोर आहेत. त्यामुळे पाटलांच्या टीकेला अर्थ उरत नाही."

- मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव

Unmesh Patil
Jalgaon Tourism: ‘पर्यटन विकास’अंतर्गत वर्षभरात निधीत भरीव वाढ! जिल्ह्यातील 10 वर्षांच्या तुलनेतील स्थिती; कामेही वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.