Jalgaon Road Damage : नियोजनशून्य रस्तेकामांनी जळगावचे केले ‘जल’गाव!

Latest Jalgaon News : जिनिअर महोदयांनी गेल्या काही वर्षांत शहरात पायाभूत सुविधा उभारताना ज्या अक्षम्य चुका केल्या, नियोजनशून्य आणि तांत्रिक बाबी धाब्यावर बसवून जी कामे कशीतरी उरकली, त्यातून जळगावचे ‘जल’गाव करण्याची Impossible किमया (?) त्यांनी करुन दाखवली, असे म्हटले तरी वावगे ठरु नये.
potholes ( file photo )
potholes ( file photo )esakal
Updated on

अभियांत्रिकीच्या शब्दकोशात अशक्य अर्थात- Impossible या शब्दाला स्थान नाही, असे म्हटले जाते. आमचे जळगावातील एक इंजिनिअर मित्र जे की मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी चर्चेतून ते नेहमी हे सांगत असतात. जळगावात रस्ते, गटार, पुलांची कामे करणाऱ्या काही यंत्रणा आणि त्यातील इंजिनिअर महोदयांनी गेल्या काही वर्षांत शहरात पायाभूत सुविधा उभारताना ज्या अक्षम्य चुका केल्या, नियोजनशून्य आणि तांत्रिक बाबी धाब्यावर बसवून जी कामे कशीतरी उरकली, त्यातून जळगावचे ‘जल’गाव करण्याची Impossible किमया (?) त्यांनी करुन दाखवली, असे म्हटले तरी वावगे ठरु नये. (Unplanned road works made water pond)

गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतरच्या काही दिवसांत ज्या- ज्या दिवशी जळगाव शहरात थोडा अधिक पाऊस पडला, त्या प्रत्येक दिवशी शहरातील रस्त्यांची जी अवस्था झाली, ती ‘तुंबई’ झालेल्या मुंबईपेक्षा वेगळी नव्हती. राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील नागरिकांचे आश्रयस्थान असलेल्या दोन कोटींच्या मुंबई शहराची वाढत्या लोकसंख्येने पावसाळ्यात ‘तुंबई’ होणे स्वाभाविक म्हटले तरी, जळगावचे ‘जल’गाव कसे झाले? हा प्रश्‍न जळगावात विकासकामांचे प्रेझेंटेशन करणाऱ्यांना कसा पडत नाही? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्‍न आहे. असो..

तर, गेल्या काही वर्षांत, म्हणजे साधारण पाच- सात वर्षांपासून, विशेषत: कोरोनाचा तीव्र टप्पा गेल्यानंतर जळगाव शहरात बहुतांश भागांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. शहरातील रस्त्यांची अवस्था, त्यातील खड्डे ही खरेतर दशकभरापासून चेष्टेचा व संतापाचा विषय झाली होती.

त्यावर उतारा सापडून अखेर कोट्यवधींचा निधी येतोय, काहीतरी कामे होतायत म्हणून जळगावकरांनी ती स्वीकारलीही. पण, यापैकी बहुतांश कामांचा दर्जा, गुणवत्तेबद्दल प्रत्येक टप्प्यावर शंका यावी, अशी स्थिती आहे. मग ते सुरवातीला ५४ कोटींच्या निधीतून झालेली डांबरीकरणाची कामे असोत, नंतर १०० कोटींच्या निधीतून प्रगतिपथावरील कामे असोत, की जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम असो..

या सर्वच कामांच्या बाबतीत कदाचित गुणवत्ता व दर्जाबाबत मतप्रवाह असू शकेल, मात्र ही कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीनही यंत्रणांनी ही कामे अगदीच नियोजनशून्य पद्धतीने व कोणत्याही तांत्रिक बाबींची पडताळणी, तपासणी न करता कशीतरी उरकून नेली, आणि आजही तोच प्रकार सुरू आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. (latest marathi news)

potholes ( file photo )
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंबंधी मोठा निर्णय; संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला, हैदराबाद गॅझेटचं काय?

त्याचाच परिणाम म्हणून की काय, गेल्या वेळच्या आणि यंदाच्याही पावसाळ्यात जळगावचे ‘जल’गाव झाल्याचे दिसून येते. अगदी जून महिन्यापासून दर आठवड्यानंतर, किंवा दर पंधरवड्याला जळगावातील रस्त्यांची अवस्था ‘तुंबई’सारखी झाली, आणि हे चित्र सामान्य नागरिकांसह हे नियोजनशून्य रस्ते करणाऱ्या कथित अभियंत्यांनीही पाहिले, अनुभवले..

रस्त्यांची कामे करताना त्यावरील पाण्याचा निचरा कसा व कुठे होईल, याचे नियोजन झाले नाही. कुठे डांबरी, कुठे सिमेंटचे रस्ते आवश्‍यक आहेत, याचे नियोजन दिसून आले नाही. रस्त्यांच्या कडेला गटारांची दुरुस्ती अथवा रस्त्यावरील पाणी गटारांमधून वाहून जाईल, अशी व्यवस्था केलेली नाही. ज्यांना रस्त्याचे काम मिळाले, त्यांनी ते उरकले.

काम झाल्यानंतर रस्त्यावरील तुंबलेल्या पाण्याची समस्या समोर आल्यानंतर त्यावर ह्या यंत्रणा वेगवेगळे स्पष्टीकरण देऊ लागलेत, तर काही तांत्रिक ज्ञानही पाजू लागलेत. मात्र, त्याची जबाबदारी ही कामे करणारी एकही यंत्रणा घ्यायला तयार नाही. म्हणूनच अगदी हिवाळ्यातही गर्मीने त्रस्त करणाऱ्या शुष्क जळगावला ‘जल’गाव करण्याची Impossible किमया या अभियंत्यांनी करुन दाखविल्याचा खेद बाळगायचा की, संताप व्यक्त करायचा? हा जळगावकरांसमोर प्रश्‍न आहे.

विविध माध्यमांतून प्राप्त कोट्यवधींच्या निधीतून होणाऱ्या रस्तेविकासाच्या ‘राजमार्गा’मुळे शहरातील एका मोठ्या पेट्रोलपंपाला आपल्या पंप स्टेशन व वाहनतळाची उंची दीड फुटाने उचलावी लागली. त्यासाठी बारा-पंधरा लाखांचा मोठा खर्चही झाला. अर्थात, या खर्चाचा भार कंपनीने उचलल्याचे सांगितले जाते. रस्त्यांतील पाणी वऱ्हांड्यात, पायऱ्यांवर, अंगणात आणि थेट दुकानांमध्ये येणारे असे अनेक जण पीडित आहेत.

potholes ( file photo )
Ladki Bahin Yojana: ज्यांनी बोगसगिरी करुन लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले, त्यांच्या खात्यावर शासकीय व्यवहार होणार नाहीत; मंत्री तटकरेंची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.