Jalgaon Unseasonal Rain : वादळाचा केंद्रबिंदू होता ‘बेळी’ गाव; 60 कुटुंबीयांचे संसार उघड्यावर

A tree fell on the house during the storm.
A tree fell on the house during the storm. esakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) वादळाने मोठा तडाखा दिला. जिल्ह्यात सर्वत्र गारा पडल्या. सोबतच झाडेही उन्मळून पडली. ३०० किलोमीटर प्रतिवेगाने झालेल्या वादळाने सर्वाधिक नुकसान बेळी (ता. जळगाव) येथे झाले आहे. (jalgaon Unseasonal Rain epicenter of storm was Beli village jalgaon news)

सुमारे साठ घरे उद्ध्वस्त झाली असून, त्या नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत.

नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात झाली असून, तहसीलदार नामदेव पाटील यांच्या टीमने पडलेल्या घरांची पाहणी केली. रस्त्यात पडलेली झाडे नागरिक, जेसीबी व इतर यंत्रणेच्या सहाय्याने रस्त्यावरून बाजूला केली आहेत. नशिराबाद ते बेळीदरम्यान अनेक झाडे उन्मळून पडली. वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. पोलिस पथक, नशिराबाद नगर परिषदेच्या पथकाने रस्ता मोकळा करण्यास मदत केली.

अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळाचा पिकांनाही फटका बसला आहे. गहू, ज्वारी, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवर झाडे पडली आहेत. ती उचलण्याचे काम सुरू आहे. पीक व घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A tree fell on the house during the storm.
Jalgaon Market Committee Election : 87.53 टक्के मतदान; रविवारी मतमोजणी

"वादळाचा केंद्रबिंदू बेळी गाव व परिसर होते. सर्वाधिक घरांचे नुकसान येथे झाले आहे. पंचनामे सुरू असून, लवकरच आपत्तीग्रस्तांना शासकीय नियमाप्रमाणे मदत दिली जाईल." -नामदेव पाटील, तहसीलदार, जळगाव

४२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

बुधवारी (ता. २६) झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने एकूण ४२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात जळगाव तालुक्यात ३१.९० हेक्टर, जामनेर तालुक्यात २६५.१५ हेक्टर, भुसावळ तालुक्यात १२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, बाजरी, कांदा, सोयाबीन, केळी, फळपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे. एकूण ६५ गावांतील ६५५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

A tree fell on the house during the storm.
Jalgaon Market Committee Election : मतदान केंद्रावर गोंधळ, चाळीसगावात सौम्य लाठीमार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()