Jalgaon Unseasonal Rain : अनेक भागांत वादळी तडाखा; हजारो हेक्टरवरील केळीबागा उद्ध्वस्त

 A cement embankment overflowing the Khadki River due to flooding and  Flooding in lawan Gali due to unseasonal rains
A cement embankment overflowing the Khadki River due to flooding and Flooding in lawan Gali due to unseasonal rains esakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर, यावल, बोदवड, भुसावळ तालुक्यांना सलग तिसऱ्या दिवशी वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जामनेर, बोदवड तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट झाली. (jalgaon unseasonal rain stormy rain for third day with Hailstorm occurred in many villages news)

जामनेर तालुक्यात खडकी नदीला पूर आला असून, नदी-नाले तुडुंब झाले आहेत. तर दुसरीकडे वादळात मुक्ताईनगर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील केळीबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हिंगणे (ता. बोदवड) येथे वादळात शाळेचे पत्रे उडाली, तर तोंडापूर (ता.जामनेर) येथे वीज कोसळून सात जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

जिल्ह्यातील स्थिती

- बोदवडला गारपीट, शाळेचे पत्रे उडाली

- तोंडापूरला वीज कोसळून सात जनावरांचा मृत्यू

- जामनेर तालुक्यातील नदी-नाले तुडुंब

- यावलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस

- पारोळ्यात कापसाच्या गाठीत शिरले पाणी

बोदवडला घर, शाळेचे नुकसान

तालुक्यात आज दुपारी दोनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे हिंगणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छतावरील पत्रे, साळशिंगीत गोठ्याची पत्रे उडाली. यासह मनूर बुद्रूक, खुर्द साळशिंगी यासह शहरात जामनेर रोड, भुसावळ रोड या भागात झाडे उन्मळून पडली. तसेच शेतातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच करंजी, जुनोना या भागात केळीचे नुकसान झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 A cement embankment overflowing the Khadki River due to flooding and  Flooding in lawan Gali due to unseasonal rains
Jalgaon Market Committee Election : 87.53 टक्के मतदान; रविवारी मतमोजणी

तोंडापूरला शेळ्या, बैल मृत्यूमुखी

परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे वीज कोसळून सहा शेळ्या व बैलाचा मृत्यू झाला. ढालगाव येथे घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर आला असून, मोठे नुकसान झाले. दोन तास चाललेल्या जोरदार पावसाने नदी- नाले भरून वाहू लागले आहेत. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

दरम्यान, मृत झालेल्या शेळ्या व बैल या नाशिक जिल्ह्यातील तांदूळवाडी पोखरी येथील मेंढपाळ साहेबराव बाळू शिंदे यांच्या असून, तोंडापूर येथील मनकर्नाबाई चौधरी यांच्या शेतात बसविण्यात आल्या होत्या. जनावरे दगावल्याची माहिती तोंडापूर तलाठी शिवाजी काळे यांना मिळताच जामनेर तहसीलदार याचे आदेशानुसार तत्काळ पंचनामा करण्यात आला. या वेळी कोतवाल सुनील लोखंडे, विठ्ठल दांगोडे, भीमराव रावते, संतोष साबळे यांनी नुकसान झालेल्या कुटुंबाला मदत केली.

मुक्ताईनगरला गारपीट

तालुक्याला वादळी पावसासह गारपिटीने झोडपले. शुक्रवारी (ता.२८) दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी तालुक्यातील सुकळी, दुई,

डोलारखेडा, घोडसगाव, कुंड, पिंप्री आकाराऊत या पूर्णाकाठच्या केळीपट्ट्यात तब्बल वीस मिनिटे गारपीट झाली. तसेच सातोड, तरोडा, रुईखेडा, ढोरमाळ, निमखेडी खुर्द आदी भागात गारपिटीमुळे कांदा व मका पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. वादळात अनेक वृक्ष कोसळले तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन कापणीवर आलेल्या हजारो हेक्टरवरील केळीबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 A cement embankment overflowing the Khadki River due to flooding and  Flooding in lawan Gali due to unseasonal rains
Dhule Market Committee Election : ‘लक्ष्मी’दर्शनाला पार्ट्यांसह पैठणीचा साज! मतदारांची चांदी...

यामुळे केळी उत्पादक शेतकरी बांधवांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. पुन्हा सायंकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले असून, मेघगर्जना जोरदार सुरू आहे. यामुळे अवकाळीचे संकट घोंगावत आहे. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून होत आहे.

यावलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

शहरासह तालुक्यात सायंकाळी चारपासून वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या पावसाने तालुक्यात कुठेही नुकसानीचे अद्याप वृत्त नाही. मात्र शहरातील शुक्रवारच्या आठवडे बाजारात, व्यापारी वर्गासह नागरिकांची धांदल उडाली होती.

दरम्यान, गुरुवारी तालुक्यातील यावल, किनगाव, फैजपूर परिसरात महसूल विभागाच्या प्राथमिक पाहणीनुसार १८८ शेतकऱ्यांचे मका, केळी पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले असून, नुकसानीचा अंतिम आकडा समजलेला नाही, ही माहिती तहसीलदार महेश पवार यांनी दिली आहे.

जामनेर तालुक्यात जोर कायम

येथून जवळच असलेल्या हिवरखेडा (तवा), शेंगोळा, चिंचखेडा, लोणी, फत्तेपूर, मादनी, ढालगाव, ढालशिंगी (ता. जामनेर) येथे शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही दुपारी दीडच्या सुमारास वादळासह जोरदार झालेल्या पावसामुळे वाकडी येथे वघाड नदीला पूर आला. ढालशिंगी येथील नाल्याला व तोंडापूर येथेही एक तास जोरदार पाऊस झाल्याने खडकी नदीला पूर आला आहे.

 A cement embankment overflowing the Khadki River due to flooding and  Flooding in lawan Gali due to unseasonal rains
Unseasonal Rain: जिल्ह्यात 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा तोंडचा हिरवला ‘घास’! अवकाळी अन् गारपिटीने उडवली दाणादाण

सिमेंट बंधारे पुरामुळे उन्हाळ्यात भरून वाहू लागले आहे. तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गुरांचा चारा वाया जात असल्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे. मका व बाजरी कांदा पिकासह वादळामुळे झाडावरील आंब्याच्या कैऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, तोंडापूर येथे हेमाडपंथी बारव परिसरातील घरांवर झाड पडले असून, विजेचा खांबही वाकला आहे. दरम्यान आज सायंकाळी साडेसहापर्यंत शहापूरच्या वाघोळा प्रकल्पात खडकी नदीच्या पुराचे पाणी पोहोचले असून, शेतकऱ्यांना ठिबक लागवडीसाठी फायदा होणार आहे.

पारोळ्यात मक्यासह कापसाचे नुकसान

शहरासह परिसरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजार समिती आवारातील मका ओला झाला. दरम्यान, जिनिंग परिसरात कापसासह सरकी ओली झाली आहे. तसेच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे लवण गल्ली परिसरात गटारीच्या पाण्यासह पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले होते. या पावसामुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाजरी, कांदा, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले असून, तामसवाडी, देवगाव परिसरात सूर्यफूल पिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

 A cement embankment overflowing the Khadki River due to flooding and  Flooding in lawan Gali due to unseasonal rains
Jalgaon Unseasonal Rain : पन्नासपेक्षा अधिक घरांचे बेळीत उडाले छत

मारवडला वाहतूक ठप्प

वादळी वाऱ्यासह शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने धार, मारवड, कळमसरे, डांगरी, बोहरा, पाडळसरे, शहापूर, खेडी, वासरे, नीम, तांदळी चौबारी, जैतपीर आदी भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. धार- मारवड रस्त्यावर बाभळीचे झाड आडवे पडल्याने सुमारे दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.

वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी घरांचे पत्रे उडाली तर निंभोरा येथे अरुण साहेबराव वाघ यांच्या राहत्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. निंभोरा परिसरासह अंतुर्ली, रंजाणे, तासखेडा, आमोदे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गंगापुरी येथे घराचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.

 A cement embankment overflowing the Khadki River due to flooding and  Flooding in lawan Gali due to unseasonal rains
Jalgaon Unseasonal Rain : वादळाचा केंद्रबिंदू होता ‘बेळी’ गाव; 60 कुटुंबीयांचे संसार उघड्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.