Jalgaon News : कलिंगड पिकविण्यासाठी रसायनाचा वापर

Jalgaon News : जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे कलिंगड, उसाचा थंडगार रस, आइस्क्रीम व इतर शीतपेयांना मागणी वाढली आहे.
Watermelone
Watermeloneesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे कलिंगड, उसाचा थंडगार रस, आइस्क्रीम व इतर शीतपेयांना मागणी वाढली आहे. मात्र, रसायनयुक्त कलिंगड व दूषित पाण्याच्या बर्फाच्या वापरामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शहरात कलिंगड खाल्ल्यानंतर काही नागरिकांना पोटदुखी व घसादुखीचा त्रास होत असून, रुग्ण डाक्टरांकडे तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आहे, असा सल्ला डाक्टरांनी दिला आहे. (Jalgaon Use of chemical to grow watermelone)

प्रशासनाचे दुर्लक्ष

ऊसासह विविध ज्युसांमध्ये वापरला जाणारा बर्फ दूषित पाण्यापासून तयार केलेला असल्यास कावीळ, पोटदुखी आदी आजार होण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर विक्री केल्या जाणाऱ्या फालुदा आइस्क्रीममध्ये बनावट दुधापासून तयार केलेला खवा व लस्सी आदीचा वापर होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे अन्न व भेसळ प्रशासन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे फावले आहे.

अशी ओळखा भेसळ..

*अपरिपक्व कलिंगड तोडून त्यावर रंग दिला जातो

*गर लाल होण्यासाठी रसायनांचा वापर

*फ्रीजमध्ये कलिंगड थंड झाल्यानंतर रंगाचे पापुद्रे निघून सालीचा खरा नैसर्गिक रंग दिसू लागतो

*कलिंगडाच्या गराची फोड पाण्यात टाकल्यास पाण्याला लाल रंग होतो

*गराला टिशू पेपर लावल्यास तो लाल होत आहे.

Watermelone
Solapur Summer : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस; सोलापूरचा पारा ४२ अंशावर

"उलट्या होणे, पोट दुखणे, मळमळ होणे, डायरिया, कावीळ या आजाराचे रोज ३० ते ४० रुग्ण येतात. बाहेरील पदार्थ आपण खातो. ते किती स्वच्छतेत बनविले गेले आहेत, याची खात्री करावी. रस, मठ्ठा, बर्फातून पोटात इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे पोटाचे विकार होतात."- डॉ. नेहा चौधरी, सहाय्यक प्राध्यापिका, ‘जीएमसी’

Watermelone
Jalgaon Loksabha: भाजपचा विद्यमान खासदार ठाकरेंकडून लढणार? लोकसभेचं समीकरण बदलणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.