जळगाव : शहर आणि जिल्ह्यात जवळपास ३३ हजारांवर ऑटोरिक्षा धावतात. महागडे पेट्रोल-डिझेल परवडत नसल्याने गॅसकिट ऑटोरिक्षांची मागणी वाढली. थेट कंपन्यांनीही सीएनजी-एलपीजी किटसह नव्या रिक्षा बाजारात उतरवल्या. वर्ष-दोन वर्षात या रिक्षा रस्त्यावर धावत्याही झाल्या. मात्र, या ऑटोरिक्षांचे इंधन भरण्याचे पंपच जळगाव शहरात नसल्याने ९९ टक्के वाहनधारक बेकादेशीर चालविल्या जाणाऱ्या गॅसपंपावर इंधन भरत आहेत. (Use of cooking gas as fuel in auto rickshaw in city )