African Swine Fever : ‘आफ्रिकन स्वाइन फिवर’च्या पार्श्वभूमीवर दक्षता; जळगाव जिल्ह्यात 9 हजारांहून अधिक वराहांचे लसीकरण

African Swine Fever : वराहांपासून आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे.
African Swine Fever
African Swine Fever esakal
Updated on

जळगाव : वराहांपासून आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून जळगाव जिल्ह्यात ९ हजार ५९९ वरांहांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांनी दिली. वराहांपासून आफ्रिकन स्वाइन फिवर प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळे जिल्ह्यापासून ९० ते १२० किलोमिटर अंतरावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात वराह पालन मोठ्या प्रमाणावर आहे. (Vaccination of more than 9 thousand pig in district vigilance against African Swine Fever )

परंतु या वराहांपासून आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याचे संक्रमण वाढू नये, यासाठी नंदुरबार जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातही वराह पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून, सुमारे ९ हजार ६०० वराह संख्या आहे. या साथ आजाराचे संक्रमण होऊ नये, या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात वराहांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी २० ते २२ वर्षापूर्वी तसेच कोरोना’ संसर्गादरम्यान कोंबड्यांवरील राणीखेत आजाराचे संक्रमण झाले होते.

या दरम्यान राज्य शासनाच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन विभागाकडून पोल्ट्री फार्मवरील हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. जळगाव जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागातर्फे सुमारे १५ रॅपिड ॲक्शन पथके २०२१-२२ दरम्यान कोंबड्याचे लसीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पाठविण्यात आले होते. ही सर्व पाश्वभूमी पाहता वराहांपासून आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण प्रादुर्भाव होऊ नये. (latest maratahi news)

African Swine Fever
Nashik Swine Flu Update : शहरात 24 स्वाइन फ्लू रुग्ण! खासगी रुग्णालयांना आकडेवारी देणे बंधनकारक

जळगाव जिल्ह्यात पांढरे अमेरिकन वराह पालन व्यवसाय बऱ्याच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. वराहांपासून आफ्रिकन स्वाईन फिवर प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या पथकाकडून जिल्ह्यातील सर्व १५ तालुकास्तरावर वराहांचे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी यांनी दिली.

''अफ्रिकन स्वाइन फिवरची लक्षणे ताप, खाणे बंद होणे, त्वचेवर किंवा अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्राव होणे, कोणतेही लक्षण न दाखवता मृत होणे आदी लक्षणे आहेत. मानवामध्ये याचा प्रसार होत नाही. परंतु या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून वराह लसीकरण करण्यात येत आहे.''- डॉ. श्यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, जळगाव.

African Swine Fever
African Swine Fever : अकोला शहरातील वराहांमध्ये 'आफ्रिकन स्वाईन फिवर' रोगाचा प्रादुर्भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.