Jalgaon News : वरणगाव पोलिस ठाणे प्रभारीची बदली! ट्रकचोरीचा खोटा गुन्हा दाखल करणे भोवले; पोलिस अधीक्षकांचे आदेश

Latest Jalgaon News : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी भरत चौधरी यांची वरणगाव प्रभारी पदावरून उचलबांगडी करीत नियंत्रणकक्षात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी काढले.
Police Transfers
Police Transfersesakal
Updated on

Jalgaon News : वरणगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी तक्रारदारासोबत संधान साधून विम्याच्या रकमेवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने ट्रक चोरीचा खोटा गुन्हा दाखल करवून घेतल्याचे उघडकीस आले आहे. ट्रकचोरीचा गुन्हा दाखल करणे, या अधिकाऱ्याच्या अंगलट आले असून, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी भरत चौधरी यांची वरणगाव प्रभारी पदावरून उचलबांगडी करीत नियंत्रणकक्षात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी काढले. (Warangaon Police Station in charge Transfer)

वरणगाव येथील रहिवासी ट्रकचालक कर्जबाजारी झाला होता. तसेच ट्रकसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते देखील थकले होते. त्याने वरणगाव पोलिस ठाण्यात ट्रक चोरीस गेल्याची खोटी तक्रार दिली होती. त्यानुसार वरणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांनी गुन्हा दाखल केला होता.

या ट्रकचालकाने धुळे येथील एका भंगार व्यावसायिकाकडे नेऊन तो मोडला. त्यातून त्याला लाखो रुपये मिळाले होते. त्यानंतर चालकासह पोलिसांनी संगनमत करून त्या ट्रकचा इन्शुंरन्स देखील पास करून घेतला होता. त्यातून मिळालेले सात लाख रुपयांची रोकड दोघांची हडप केल्याची तक्रार पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाखल झाली होती.

संबंधित ट्रकचालक याने यापुपूर्वी देखील पोलिसात ट्रक चोरीचे बनावट गुन्हे दाखल केले आहे. त्याने पुन्हा पोलिस अधिकाऱ्याला हाताशी धरून बनावट गुन्हा दाखल केल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. त्यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आणून देली. या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेतले. (latest marathi news)

Police Transfers
Pachod Crime News : नांदर येथे गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

त्याला ‘खाकी’ हिसका दाखविताच त्याने संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून ट्रक चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याची कबुली त्याने दिली. संपूर्ण घटना समोर आल्यानंतर या प्रकाराची तत्काळ दखल घेत पोलिस अधीक्षकांनी तत्काळ वरणगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांची पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली असून, याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे.

सहकाऱ्यांशीही वाद

प्रभारी पोलिस अधिकारी भरत चौधरी यांच्याबाबत अनेक तक्रारी वरिष्ठांना प्राप्त होत होत्या. त्यात मुख्यत्वेकरून सहकारी कर्मचाऱ्यांशी तुच्छतेची वागणूक देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Police Transfers
Nashik Crime News : पूर्ववैमनस्यातून सफाई कामगाराचा निर्घृण खून; पंडित कॉलनीत संशयितांनी केले चॉपरने वार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.