Jalgaon Rural Hospital : वरणगाव ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांअभावी वाऱ्यावर

Jalgaon Rural Hospital : ग्रामीण रुग्णालयात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून रुग्णांना औषोधोपचार मिळत नाही. शनिवारी (ता.२३) अचानक रूग्णालयात रुग्णसंख्या वाढली असता वैद्यकीय अधिकारी नसल्याचे समोर आले.
Depleted wards due to lack of medical officers.
Depleted wards due to lack of medical officers.esakal
Updated on

Jalgaon Rural Hospital : येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून रुग्णांना औषोधोपचार मिळत नाही. शनिवारी (ता.२३) अचानक रूग्णालयात रुग्णसंख्या वाढली असता वैद्यकीय अधिकारी नसल्याचे समोर आले. रुग्णांनी येथील सुनील काळे यांना रुग्णालयाविषयी माहिती दिली असता त्यांचे सोबत श्‍यामराव धनगर, मिलिंद भैसे, सुनील माळी, योगेश माळी, गोलू राणे, आकाश निमकर आदींनी नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामीण रूग्णालयात आंदोलन केले. (Jalgaon Varangaon Rural Hospital Shortage of Doctors)

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करा; अन्यथा रविवारी (ता. २४) ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा दिला असता तात्पुरता चार्ज डॉ. अहिरराव यांच्याकडे देण्यात आल्याने एक दिवसाची रुग्ण ओपीडी काढण्यात आली.

येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णालय वाऱ्यावर असून, रुग्णसेवेला फटका बसत आहे. नैसर्गिक तापमानात दैनंदिन वाढ होत असल्याने रुग्णांच्या संख्यादेखील वाढ होत आहे. वरणगाव ग्रामीण रुग्णालय हे मध्यवर्ती असल्याने महामार्ग व लोहमार्गावरील अपघाती रुग्णांना तत्काळ उपचारांच्या संधी उपलब्ध होतात. (latest marathi news)

Depleted wards due to lack of medical officers.
Jalgaon Crime News : जळगावात 10 लाखांचे एमडी ड्रग पकडले; मनपाची पडकी शाळा बनली अड्डा

त्याच दृष्टीने शहराला लागून खेडेगावातील नागरिक वैद्यकीय तपासणीसाठी येत असतात. रोज अडीचशे, तीनशे जणांची ओपीडी आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश उगले यांचा कार्यकाळ १० मार्चपासून संपल्याने ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय अधिकारी नाही. त्या मुळे रुग्णांचे हाल होत आहेत. उपस्थित कर्मचारी, परिचारिका व कर्मचारी यांच्याकडून पातळीवर रुग्णांवर ड्रेसिंग, प्रथमोपचार, टी.टी. इंजेक्शन अशा प्रकारचे प्राथमिक उपचार केले जात आहे.

मात्र, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय रूग्णांना औषधी मिळू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर नसल्याने रुग्णांचे गैरसोय होत आहे. ग्रामीण परिणामी, कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. तर गरीब रुग्णांना विना उपचार परतावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Depleted wards due to lack of medical officers.
Jalgaon Lok Sabha Election 2024 : पश्चिम भाग लाल दिव्यापासून वंचितच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.