भुसावळ : सध्या विणीचा हंगाम जवळ येत असल्याने सुगरण नराचे घरटे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र लांब गवताच्या पात्यांची कमतरता असल्याने एका सुगरण नराने चक्क दुसऱ्याच्या घरट्याचे गवताचे पाते चोरले. पक्षीमित्र अनिल महाजन यांच्या कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली. तालुक्यातील वरणगाव येथील पक्षी अभ्यासक व चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल महाजन हे गेल्या २७ वर्षांपासून विविध पक्ष्यांचे निरीक्षण व अभ्यास करीत आहेत. (various expressions notes by Sugran bird friend Mahajan )