Jalgaon News : सकाळच्या पारी, वासुदेवाची स्वारी; खानदेशात हाक बंद होण्याच्या वाटेवर, गेला वासुदेव कुणीकडे

Jalgaon : वासुदेवाचा आवाज सध्या कमी होऊ लागल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे गेला वासुदेव कुणीकडे असे आता वाटू लागले आहे.
Vasudev seen after a long time
Vasudev seen after a long timeesakal
Updated on

Jalgaon News : राम राम स्मरा आधी, वासुदेव हरी वासुदेव हरी ।

सकाळच्या पारी,आली वासुदेवाची स्वारी।।

खानदेशात गेली अनेक दशके भल्या पहाटे, मागच्या प्रहरी ऐकू येणारा वासुदेवाचा आवाज सध्या कमी होऊ लागल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे गेला वासुदेव कुणीकडे असे आता वाटू लागले आहे. (Vasudev disappeared now due to Time changed functions of society changed )

वासुदेव तसा घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग, गवळणी गत दान मागणारा लोककलाकार.डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोड अंगरखा, पायात विजार किंवा धोतर ,गळ्यात कवड्यांच्या आणि रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर आणि कंठावर गंधाचा टिळा,कमरेला गुंडाळलेला शेला किंवा उपरणे,हातात पितळी टाळ, कमरेला पावां,मंजिरी,गळ्यात मोठी झोळी असा वेस धारण केलेला वासुदेव खानदेश वासियांनी आणि त्यांच्या पिढ्यांनी अनेक दशके पाहिला आहे. मात्र काळ बदलत चालला समाजाची कामे बदलत चालली आणि वासुदेव आता दिसेनासा झाला आहे. (latest marathi news)

Vasudev seen after a long time
Jalgaon News: फैजपूरला रस्त्यावरील पाणी साचते शाळेच्या प्रांगणात; म्युनिसिपल हायस्कूलच्या समस्येकडे पालिकेचे दुर्लक्ष

वासुदेव ही महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण जात. वृत्तीने हे धार्मिक भिक्षेकरी. अनेक दशके सकाळच्या प्रहरी खेड्यांत त्यांचा रहिवास दिसून येतो. वासुदेव म्हणजे समाज प्रबोधन करणारी चालतीबोलती एक संस्थाच. गल्लीबोळात परमेश्वराचे गुणगान गात घरच्या लक्ष्मीने सुपात आणलेले धान्य स्वतःभोवती गरागरा फिरवत त्या घराच्या मृत पावलेल्या व्यक्ती आणि कुळाचा उद्धार करत गावाला जागे करणारा एक जागल्या म्हणजे वासुदेव.

त्यांच्या गीतातून जे गुणगान गातो आणि तत्वज्ञान सांगतो त्यात ईश्वरी दैववाद दिसून येतो.सत्य बोलावे, परमेश्वराचे गुणगान गावे. वासुदेव ही परंपरा हजार बाराशे वर्षापूर्वीचे असावी. संत तुकाराम,संत नामदेव,संत एकनाथ यांच्या साहित्य आणि रूपकात वासुदेवाचा उल्लेख आढळतो. शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवताना वसुदेवाची मध्यस्थी म्हणून वापर केल्याचा उल्लेखही आढळतो.असा हा वासुदेव आता विस्मरणात जात असल्याची स्थिती आहे.

Vasudev seen after a long time
Jalgaon News: अमळनेर मतदार संघात 61 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी : मंत्री अनिल पाटील; 5 ग्रामीण महत्त्वपूर्ण मार्गांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.