Vegetable Rate Hike : पालेभाज्या कडाडल्या! बजेट काेलमडले; फैजपूरच्या बाजारात कोथिंबीर 200 रुपये किलो

Vegetable Rate Hike : पावसाळ्याचे दिवस असले तरी कोथिंबीर आणि सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
Vegetable Rate Hike
Vegetable Rate Hikeesakal
Updated on

Vegetable Rate Hike : पावसाळ्याचे दिवस असले तरी कोथिंबीर आणि सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. येथील आठवडे बाजारात बुधवारी (ता. २६) कोथिंबीरचे भाव दोनशे रुपये व हिरव्या पालेभाज्याचे भाव १०० रुपये प्रतिकिलो होते. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे भाव वधारल्याने सर्वसामान्य लोकांना डाळी शिजवायची वेळ आली आहे. शहरात डेली भाजी मंडईमध्ये दररोज शेतकरी ताज्या पालेभाज्या विक्रीसाठी आणतात. मात्र येथे दर बुधवारी भरणारा आठवडे बाजाराचा लौकिक आहे. (vegetable rate hike Coriander is Rs 200 per kg in Gazipur market )

गेल्या महिनाभरात उन्हाच्या तीव्रतेने तसेच अधूनमधून झालेल्या वादळासह अवकाळी पावसाने भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे येथे रोज भरणाऱ्या भाजी मंडईसह आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी, भाज्यांच्या दरात २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात भाजीपाल्याच्या आवकमध्ये घट होते. अवकाळी पावसानेही पिकांचे नुकसान केल्याने दररोज दोन्ही वेळच्या स्वयंपाकात वापरण्यात येणारी कोथिंबीर जागेवर खराब झाली.

परिणामी, कोथिंबीर दर गगनाला भिडल्याने सर्वात महाग झाली आहे. अलीकडे बाजारात सहज उपलब्ध होत असलेल्या काही हिरव्या भाज्या दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे आता उपलब्ध होत असलेल्या भाजीपाल्यावर सर्वसामान्य लोकांना समाधान मानावे लागत आहे. त्याला जोड म्हणजे डाळींवर स्वयंपाक भागवावे लागत आहे. आवक नसल्याने कांदापातही बाजारातून गायब झाल्याचे दिसून आले आहे. (latest marathi news)

Vegetable Rate Hike
Nashik Vegetable Rate Hike : उन्हाच्या तडाख्यामुळे पाले, फळभाज्यांचे दर वधारले; नाशिक बाजार समितीत आवक 30 टक्क्यांवर

दरम्यान, येथील आठवडे बाजारात बुधवारी पालेभाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यात कांदा ४० रुपये, मेथीचे दर १६० रुपये, जाड व बारीक हिरवी मिरची १२०, टमाटा ८०, भेंडी ८०, फुलकोबी १००, काकडी ६०, चवळी १००, गावरान गवार १६०, गिलके ८० रुपये यासह लसूण २४० व अद्रक २०० रुपये प्रतिकिलो असे भाव बुधवारी (ता. २६) येथील आठवडे बाजारात होते.

दमदार पावसानंतर आवक वाढणार

उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवकमध्ये घट होते. मात्र अवकाळी पावसानेही पिकांना झोडपून काढल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. कोथिंबीर सर्वात महाग झाली आहे. कोथिंबीरला आज येथील आठवडे बाजारात दोनशे रुपये दर तर पालेभाज्या ३० ते ४० टक्क्यांनी महाग झाल्याचे दिसून आले. पावसाळ्यात लागवड होणाऱ्या पालेभाज्यांचे उत्पादन हाती आल्यानंतर भाजीपाला बाजार आवाक्यात येईल.

Vegetable Rate Hike
Vegetable Rate Hike : अमळनेरच्या बाजारत भाजीपाला महागला! आर्थिक गणित बिघडले; अद्रक 160 रुपये किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.