Vegetable Rate Hike : गेल्या काही दिवसांपासून पाल्याभाज्याही महाग झाल्या आहेत. त्याचाच अनुभव अमळनेर येथे सोमवारी भरलेल्या आठवडी बाजारातही नुकताच आला. भाज्यांसह इतरही वस्तू महागल्याने महिलांचे आपल्या स्वयंपाक घरातील आर्थिक गणितच बिघडले आहे. ऋतूबदलामुळे भाजीपाल्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यात टमाट्याचे भाव शंभर रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. दुसरीकडे मिरचीचा १२० रुपये किलो भावाचा ठसका नागरिकांच्या खिशाला जड झाला आहे. (jalgaon Vegetables rate hike in Amalner market marathi news)
इतर भाजीपालाही ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडत आहे. आठवडे बाजारातही भाजीपाला खरेदीची गर्दी कमी दिसून येत आहे. गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने दुष्काळ पडला होता. त्यामुळे खरिपासह रब्बीचे पीक वाया गेले होते. त्यामुळे एप्रिल व मे या दोन महिन्यांत ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशाच शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली होती.
परिणामी सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. त्यात प्रामुख्याने टोमॅटोचा भाव अधिक लालभडक झाला आहे. टोमॅटोचा भाव तब्बल शंभर रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे. भेंडी, गवार, शेवग्याच्या शेगांचा भाव तब्बल १२० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे. (latest marathi news)
इतर भाजीपाही ८० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचल्याचे अमळनेर येथील सोमवारच्या आठवडी बाजारात दिसून आले. भाजीपाल्याचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडत असल्याने भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांचा कलही कमी झाल्याचे चित्र आहे.
भाज्यांचे दर प्रतिकिलो रुपयांत
टमाटे १०० रुपये, हिरवी मिरची १२०, गवार १२०, भेंडी १२०, वांगे ८०, कोबी ८०, चवळीच्या शेंगा ८०, अद्रक १६०, कांदे ४०, बटाटे ४०, शेवगा १२०, मेथी (२० रुपये एक जुडी), कोथिंबीर (१५ रुपये एक जुडी), पालक (२० रुपये एक जुडी), शेपू (दहा रुपये जुडी).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.